---Advertisement---

ऑस्ट्रेलियन संघाला मायदेशातच मिळत नाहीये चाहत्यांचा सपोर्ट, भारताच्या सामन्याला मात्र तुडुंब गर्दी

---Advertisement---

गुरुवार, 27 ऑक्टोबर रोजी भारत आणि नेदरलँड्समध्ये आमना सामना झाला. सिडनीमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात भारताने 56 धावांनी विजय मिळवला. टी-20 विश्वचषकातील पहिल्या सामन्यात पाकिस्तानला पराभूत करणाऱ्या भारतीय संघाचा हा सलग दुसरा विजय होता. उभय संघांतील हा सामना पाहण्यासाठी स्टेडियममध्ये चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. सुपर 12 फेरीचा पहिला सामना ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यात सिडनीमध्येच खेळला गेला होता. यजमान ऑस्ट्रेलियाच्या या सामन्यात मैदानात उपस्थितांची संख्या भारताच्या तुलनेत जास्त दिसली नव्हती. 

माहतीनुसार भारत आणि नेदरलँड्स यांच्यातील सामन्यासाठी सिडनी क्रिकेट ग्राउंडवर 36,426 प्रेक्षक उपस्थित असल्याचे सांगितले गेले आहे. जयमान संघ ऑस्ट्रेलियाच्या तुलनेत भारताचा सामना पाहण्यासाठी प्रेक्षक जास्त उस्तुक असल्याचे दिसत आहे. कारण 22 ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यात याच मैदानात लढत झाली होती. सुपर 12 फेरीतील हा पहिलाच सामना असून त्यासाठी 34,765 प्रेक्षकांनी मैदानात हजेरी लावली होती. साधारणतः यजमान संघाचा सामना असल्यानंतर मैदानात चाहत्यांची अधिक गर्दी पाहायला मिळते. पण ऑस्ट्रेलियाच्या बाबतीत तसे होताना दिसत नाहीये. अनेकच याविषयी आश्चर्य देखील व्यक्त करत आहेत.

भारत आणि नेदरलँड्सच्या सामन्याचा विचार केला, तर भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केली. मर्यादित 20 षटकांमध्ये भारताने 2 विकेट्सच्या नुकसानावर 179 धावा उभ्या केल्या. नेदरलँड्सला विजयासाठी 180 धावांचे लक्ष्य मिळाले होते, पण प्रत्युत्तरात त्यांचा संघ 123 धावांपर्यंतच मजल मारू शकला.

भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने या सामन्यात अपेक्षित खेळी केली, ज्याची चाहत्यांना बऱ्याच दिवसांपासून प्रतिक्षा होती. रोहितने 39 चेंडूत 53 धावा केल्या. यामध्ये 4 चौकार आणि 3 षटकारांचा समावेश होता. रोहितनंतर विराट कोहली () आणि सूर्यकुमार यादव () यांच्या बॅटमधून देखील अर्धशतके निघाली. विराटने 44 चेंडूत 3 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 62 धावांची नाबाद खेळी केली. तर दुसरीकडे सूर्यकुमारने अवघ्या 25 चेंडूत 204 च्या स्ट्राईक रेटने नाबाद 51 धावा कुटल्या. सूर्यकुमारने 7 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने या धावा केल्या.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
टी20 विश्वचषकातील सर्वात भारी व्हिडिओ, अर्धशतकवीर सूर्याला सेलिब्रेशन करण्यास विराटने पाडले भाग
VIDEO: सरकारही पडलं अन् ‘तोही’ झाला शांत, बांगलादेशच्या सलामीवीरांनी गपगुमान धरली तंबूची वाट

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---