आगामी टी२० विश्वचषक १७ ऑक्टोंबरपासून सुरू होणार आहे. अफगाणिस्तानमध्ये तालिबनने कब्जा मिळवल्यानंतर त्यांच्या क्रिकेट संघाच्या भविष्याबद्दल संभ्रम निर्माण झाला होता. टी२० विश्वचषकात अफगानिस्तानचा संघ सहभाग घेणार की नाही? हा प्रश्न उपस्थित झाला होता. पण अखेर गुरुवारी (९ सप्टेंबर) अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डने विश्वचषकासाठी संघ घोषित केला आहे. मोहम्मद शहजादचे संघात पुनरागमन झाले आहे.
तसेच फिरकी गोलंदाज राशिद खान याला संघाचा कर्णधार बनवले गेले होते. असे असले तरी संघ घोषित झाल्यानंतर काही वेळातच राशिद खानने कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे संघाने नवा कर्णधार म्हणून मोहम्मद नबीची नियुक्ती केली आहे.
संघाची घोषणा झाल्यानंतर लगेच काही वेळाने राशिद खानने कर्णधारपद सोडल्याचे घोषित केले आहे. त्याने ट्विटर पोस्ट करत ही माहित दिली आहे. पोस्टमध्ये त्याने एसीबी आणि निवडकर्ता समितीवर आरोप केले आहेत. त्याने लिहिले आहे की, संघाचा कर्णधार असूनही त्याला संघ निवडीमध्ये सामील केले गेले नाही आणि त्याला सांगितल्याशिवाय संघ घोषित केला गेला आहे.
राशिदने त्याच्या ट्विटर पोस्टमध्ये आरोप करताना लिहिले की, “कर्णधार आणि एक जबाबदार नागरिक असल्याच्या नात्याने माझ्याकडे संघाच्या निवडप्रक्रियेत सामील होण्याचा हक्क आहे. पण निवडकर्ता समिती आणि एसीबीने माझ्यासोबत चर्चा न करता संघ घोषित केला आहे. यामुळे मी संघाचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे.”
Afghanistan National Cricket Team Squad for the World T20 Cup 2021. pic.twitter.com/exlMQ10EQx
— Afghanistan Cricket Board (@ACBofficials) September 9, 2021
दरम्यान, पुढच्या महिन्यात सुरू होणाऱ्या टी२० विश्वचषासाठी भारतासह जवळपास सर्वच संघांची घोषणा झाली आहे. विश्वचषकासाठी अफगाणिस्तान, भारत, पाकिस्तान आणि न्यूझीलँड हे ग्रुप बी मध्ये सामील केले गेले आहेत.
विश्वचषकासाठी अफगानिस्तानचा क्रिकेट संघ :
राशिद खान, रहमानुल्ला गुरबाज, हजरतुल्लाह जजई, उस्मान गनी, असगर अफगान, मोहम्मद नबी (कर्णधार), नजीबुल्लाह जदरान, हशमतुल्ला शाहिदी, मोहम्मद शहजाद, मुजीब उर रहमान, करीम जनत, गुलबदीन नैब, नवीन उल हक, हामिद हसन, शरफुद्दीन अशरफ, दौलत जादरान, शापूर जादरान, कैस अहमद
राखीव खेळाडू : अफसर जजई, फरीद अहमद मलिक
महत्त्वाच्या बातम्या-
अफगाणिस्तान क्रिकेटमध्ये भूकंप, राशिदने दिला कर्णधारपदाचा राजीनामा; ‘हा’ खेळाडू नवा संघनायक
धोनीला मेंटर केल्याबद्दल करण्यात आलेल्या तक्रारीवर बीसीसीआयचे जोरदार प्रत्युत्तर
“बुमराहने मला डेल स्टेनची आठवण करून दिली”, केविन पीटरसन का म्हणाला असं, वाचा सविस्तर