---Advertisement---

‘अश्विनने माझे ऐकले नाही!’, मॅच विनिंग शॉटविषयी विराट कोहलीचा मोठा खुलासा

virat kohli
---Advertisement---

भारत आणि पाकिस्तान यांच्यात रविवारी (23 ऑक्टोबर) खेळला गेलेला सामना कोणत्याही क्रिकेटप्रेमीला विसरता येणार नाही. सामना शेवटच्या चेंडूपर्यंत चालल्यामुळे चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. पण रविचंद्रन अश्विनने शेवटच्या चेंडूवर संघासाठी एक धाव केली आणि विजय देखील मिळवून दिला. विराट कोहली त्यावेळी नॉन स्ट्रेईकवर होता आणि त्याने अश्विनला एक सल्ला दिला होता. परंतु अश्विनने मात्र विराटचा सल्ला ऐकला नाही, असेच सध्या समोर येत आहे. 

दरम्यान, भारताला पाकिस्तानवर विजय मिळवण्यासाठी शेवटच्या षटकात 16 धावांची आवश्यकता होती. मोहम्मद नवाज या षटकात गोलंदाजीसाठी आला. पहिला चेंडूवर हार्दिक पंड्या मोठा शॉट खेळण्याच्या नादात बाबर आझमच्या हातात झेलबाद झाला. षटकातील दुसऱ्या चेंडूवर दिनेश कार्तिक स्ट्राईकवर आला आणि त्याने एक धाव घेतली. यानंतर तिसऱ्या चेंडूवर विराट कोहली (Virat Kohli) स्ट्राईकवर आला आणि त्याने एख भन्नाट षटकार मारला. हा चेंडू नो बॉल देखील होता आणि भारताला फ्री हिट मिळाली. पुढच्या चेंडूवर विराट क्लीन बोल्ड झाला, पण फ्री हिट असल्यामुळे भारतालने पळून तीन धावा घेतल्या. पाचव्या चेंडूवर दिनेश कार्तिक स्टंप आउट झाला. शेवटच्या चेंडूवर रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) स्ट्राईकवर होता आणि त्याने योग्य वेळी योग्य शॉट खेळत संघाला विजय मिळून दिला.

विराटने सामना संपल्यानंतर सांगितले की, अश्विनने त्याने सांगितलेला शॉट न खेळता स्वतःच्या मनाचे ऐकले. पण अश्विनचा हा निर्णय जराही चुकीचा ठरला नाही. माध्यमांशी बोलताना विराट म्हणाला की, “जेव्हा तुम्हाला 15-16 धावांची सरासरी हवी असते आणि दोन चेंडूत दोन धावा मिळाल्या, तर लोक शक्यत निवांत होतात किंवा अधिक उत्सुक होतात. दिनेस कार्तिक बाद झाला होता. मी अश्विनला कवर्सच्या वरून शॉट मारायला सांगितला होता. पण त्याने जास्तिचे डोके चालवत. असे असले तरी, हे खूप धैर्याचे काम होते. त्याने रेषेच्या आतमध्ये येत एक चेंडू वाईड जाऊ दिला. त्यानंतर परिस्थिती अशी होती की, आम्ही चेंडू गॅपमध्ये कुठेही मारला असता, तरी जिंकलो असतो.”

उभय संघांतील या सामन्याचा एकंदरीत विचार केला, तर भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी केली. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने 8 विकेट्सच्या नुकसानावर 159 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारताने 6 विकेट्सच्या नुकसानावर सामना नावावर केला. विराट कोहली सामनावीर ठरला. त्याने 53 चेंडूत नाबाद 82 धावा कुटल्या. तर दुसरीकडे हार्दिक पंड्याने 37 चेंडूत 40 धावांचे महत्वपूर्ण योगदान दिले. तत्पूर्वी गोलंदाजी करताना अर्शदीप सिंग आणि हार्दिक पंड्या यांनी प्रत्येकी तीन-तीन विकेट्स घेतल्या.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
स्वतः हार्दिकने उघडले आपल्या यशाचे रहस्य; म्हणाला, “आता मी…”
आशिया चषकापेक्षा टी-20 विश्वचषकात भारत-पाक सामना पाहणाऱ्यांची संख्या वाढली, मोडीत निघाले सर्व विक्रम  

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---