विराट कोहली मागच्या काही महिन्यांमध्ये त्याच्या जुन्या फॉर्ममध्ये परतल्याचे पाहायला मिळाले आहे. मंगळवारी (10 जानेवारी) श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात त्याने कारकिर्दीतील 73 वे शतक ठोकले आणि काही खास विक्रम नावावर केले. भारतीय संघासाठी विराटव्यतिरिक्त रोहित शर्मा आणि शुबमन गिल यांनीदेखील या सामन्यात महत्वपूर्ण खेळी केली. फलंदाजांप्रमाणेच गोलंदाजांचे प्रदर्शन देखील कौतुकास पात्र राहिले.
विराट कोहली (Virat Kohli) मागच्या वर्षी खेळल्या गेलेल्या आशिया चषकापासून त्याच्या जुन्या लयीत परतल्याचे चाहत्यांना दिसत आहे. श्रीलंकेविरुद्ध मंगळवारी खेळल्या गेलेल्या सामन्यात देखील त्याने वादळी शतक ठोकले. त्याने या सामन्यात 87 चेंडूत 113 धावा कुटल्या. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके करणाऱ्या फलंदाजांमध्ये विराटचे नाव दुसऱ्या क्रमांकावर आहे. या यादीत पहिल्या क्रमांकावर 100 शतकांसह सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) पहिल्या क्रमांकावर आहे, तर विराटच्या नंतर ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज रिकी पाँटिंग आहे. पाँटिंगच्या नावावर 71 आंतरराष्ट्रीय शतकांची नोंद आहे.
सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत असणाऱ्या फलंदाजांमध्ये विराट सर्वाधिक शतके करणारा फलंदाज आहे. यादीतील दुसऱ्या क्रमांकाच्या फलंदाज आणि विराट यांच्यातील शतकांची तफावत मोठी आहे. यादीत दुसऱ्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियन सलामीवीर डेविड वॉर्नर आहे. वॉर्नरच्या नावावर आतापर्यंत 45 आंतराष्ट्रीय शतके केली आहे, जी विराटच्या 73 शतकांपेक्षा खूपच कमी आहेत. वॉर्नरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये केलेली शतके आणि विराटच्या वनडे फॉरमॅटमधील शतकांचा आकडा मात्र खूपच सारखाच आहे. विराडने मंगळवारी केलेल्या शतकानंतकर त्याच्या वनडे शतकांचा आकडा 45 झाला. वनडेमध्ये सर्वाधिक शतकांच्या बाबतीत देखील सचिन 49 शतकांसह पहिल्या क्रमांकावर आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सक्रिय खेळाडूमध्ये सर्वाधिक शतके करणारे फलंदाज
विराट कोहली – 73
डेव्हिड वॉर्नर – 45
जो रूट – 44
स्टीव स्मिथ – 42
रोहित शर्मा – 41
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके करणारे फलंदाज
100 – सचिन तेंडुलकर
73 – विराट कोहली
71 – रिकी पाँटिंग
63 – कुमार संगकारा
62 – जॅक कॅलिस
(Table toppers Virat and Warner have a big gap between their centuries, Root and Smith are far behind)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
VIDEO | मोहम्मद सिराजची घातक गोलंदाजी, कुसल मेंडिसला केले क्लीन बोल्ड
मायदेशात विराटचेच राज! सचिनला पछाडत पोहोचलाय दुर्मिळ विक्रमात अव्वलस्थानी