आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंची यादी पाहिली तर विराट कोहली सहाव्या स्थानावर आहे. तसेच सक्रिय खेळाडूंमध्ये तो अव्वल स्थानावर आहे. त्याने नुकतेच टी20 विश्वचषकात पाकिस्तानविरुद्ध नाबाद 82 धावा केल्या. मागील काही सामन्यांपासून त्याने जी कामगिरी केली आहे यामुळे सध्या पाहिले तर तोच क्रिकेटच्या तिन्ही प्रकारामध्ये सर्वोत्तम आहे, मात्र दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूचे वेगळेच म्हणणे आहे.
टी 20 विश्वचषक (T20 World Cup) 2022 मध्ये भारत आणि दक्षिण अफ्रीका सुपर-12 च्या एकाच गटात म्हणजेच गट-2मध्ये आहेत. गट-2 मध्ये भारताने आपला पहिला सामना जिंकलेला आहे. दोन्ही संघांचा आमना-सामना 30 ऑक्टोबरला होणार आहे. त्याआधी दक्षिण आफ्रिकेचा फिरकीपटू तबरेज शम्सी( Tabraiz Shamsi) याने आश्चर्यकारक विधान केले आहे. त्याने भारतीय फिरकीपटू युजवेंद्र चहल याला सर्वोत्तम म्हटले आहे
झाले असे की, सोशल मीडीयावर एक पोस्ट वायरल होत आहे, जिच्या कॅप्शनमध्ये लिहिलयं की, ”सध्याच्या काळात क्रिकेटच्या तीनही प्रकारामध्ये विराटपेक्षा चांगला फलंदाज दुसरां कोणी आहे का?” शम्सीने या पोस्टवर रिप्लाय करत असं उत्तर दिलयं की, ”ज्याच्या विषयी तुम्ही स्वप्नातही विचार केला नसेल.”
शम्सीने या पोस्टवर कमेंट करत युजवेंद्र चहलचं नाव लिहिलय. यानंतर चहलने उत्तर देत लिहिलं की, ‘तुम्ही तर माझ्यापेक्षाही चांगले फलंदाज आहात.’ चहलच्या या कमेंटवर उत्तर देत शम्सीने लिहिलं की ‘केवळं मीचं नाही तर तुम्ही देखील सध्याचे सर्वश्रेष्ठ फलंदाज आहात.’
Still better then you my bru ????????
— Yuzvendra Chahal (@yuzi_chahal) October 25, 2022
ऑस्ट्रेलियामध्ये चालू असलेल्या टी20 विश्वचषक 2022 मध्ये भारत आणि दक्षिण अफ्रीका हे संघ सुपर-12 च्या एकाच गटात म्हणजेच गट-2 मध्ये आहेत. भारताने सुपर 12चा आपला पहिला सामना जिंकला तसेच दक्षिण आफ्रिकेचा पहिला सामना पावसाच्या व्यतयामुळे स्थगित झाला. भारत आणि दक्षिण आफ्रिका आता 30 ऑक्टोबरला पर्थ येथे समोरासमोर येणार आहेत.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय सामना खेळताना जिंकणारा आयर्लंड दुसरा, तर पहिला…
विश्वचषकातील आव्हान राखण्यासाठी श्रीलंकेचा मास्टर प्लॅन! ‘त्या’ चौघांना केले ऑस्ट्रेलियाला रवाना






