वनडे मालिका बरोबरीत सुटल्यानंतर दक्षिण आफ्रिका आणि आयर्लंड या दोन्ही संघांमध्ये ३ टी-२० सामन्यांच्या मालिकेला सुरुवात झाली आहे. या मालिकेतील पहिल्या टी-२० सामन्यात दक्षिण आफ्रिका संघाने जोरदार विजय मिळवला आहे. या विजयात दक्षिण आफ्रिका संघातील डाव्या हाताचा फिरकी गोलंदाज तबरेज शम्सी याने बहुमुल्य योगदान दिले आहे.
तबरेज शम्सीने या सामन्यात महत्वपूर्ण ४ गडी बाद केले. तो सध्या जगातील अव्वल टी-२० गोलंदाज आहे. अर्थातच आयसीसीच्या टी२० क्रमवारीत अव्वलस्थानी आहे. परंतु अनेकांना ही गोष्ट माहीत नसेल की, तबरेज शम्सीने आपल्या कारकिर्दीची सुरुवात फिरकी गोलंदाज म्हणून नव्हे तर जलद गोलंदाज म्हणून केली होती. परंतु त्याच्या गोलंदाजीमध्ये गती नसल्यामुळे त्याच्या शाळेतील प्रशिक्षकाने त्याला फिरकी गोलंदाजी करण्याचा सल्ला दिला होता. तो आयपीएल स्पर्धेतही खेळताना दिसून आला आहे.
तसेच त्याच्या टी-२० कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं तर त्याने ३८ सामने खेळले आहेत. यात त्याने ७ पेक्षाही कमीच्या इकोनॉमीने ४२ गडी बाद केले आहेत.(Tabrej shamsi took 4 wickets against Ireland in the first T20 match)
अवघ्या २७ धावांवर ४ विकेट्स
दक्षिण आफ्रिका विरुद्ध आयर्लंड यांच्यात झालेल्या पहिल्या टी-२० सामन्यात दक्षिण आफ्रिका संघाने प्रथम फलंदाजी करताना ७ बाद १६५ धावा केल्या होत्या. यामध्ये एडन मारक्रमने ३९ आणि डेविड मिलरने २८ धावांचे योगदान दिले होते. आयर्लंड संघाकडून मार्क एडायरने ३९ धावा खर्च करत ३ गडी बाद केले होते. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या आयर्लंड संघाला ९ बाद अवघ्या १३२ धावा करण्यात यश आले होते. आयर्लंड संघाकडून हॅरी टेक्टरने सर्वाधिक ३६ धावांची खेळी केली. तर दक्षिण आफ्रिका संघाकडून गोलंदाजी करताना तबरेज शम्सी याने २७ धावा देत ४ गडी बाद केले.
बायो बबलवर उपस्थित केले होते प्रश्न
दक्षिण आफ्रिका संघाचा फिरकी गोलंदाज तबरेज शम्सी याने गेल्या काही दिवसांपूर्वी बायो बबलवर प्रश्न उपस्थित केले होते. त्याने म्हटले होते की, “कधी कधी तर असे वाटते की, आम्ही सर्कशीतल्या प्राण्यांप्रमाणे आहोत. ज्यांना फक्त सराव करण्यासाठी आणि सामना खेळण्यासाठी बाहेर काढलं जातं. कारण चाहत्यांचे मनोरंजन होऊ शकेल. हे एका खेळाडूचे किंवा संघाचे दुःख नाही. कोरोनाच्या काळात प्रत्येक खेळाडूला याचा सामना करावा लागत आहे.”
महत्त्वाच्या बातम्या-
शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला अटक, सट्टेबाजीमुळे आयपीएलमधूनही घालण्यात आलीय आजीवन बंदी
भुवनेश्वर-हार्दिकच्या जोडीवर सर्वांचे लक्ष, मनीष पांडेऐवजी ‘या’ युवा खेळाडूला मिळू शकते संधी
श्रीलंका वि. भारत दुसरा वनडे सामना कोठे आणि कधी होणार? जाणून घ्या सर्वकाही