आर्यन वारीयर्स घाटकोपर कबड्डी प्रीमियर लीग पर्व २ मधील उपविजेता संघ आहे. मागील पर्वात आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त तायकोंडो प्रशिक्षक संदीप येवले यांनी मुलगा आर्यन संदीप येवले आंतरराष्ट्रीय तायकोंडो खेळाडु यांच्या नावाने संघ घेतला होता. कबड्डी प्रेमी असल्याने हा संघ पुरस्कृत केला आहे.
पोलीस दलात कार्यरत असलेले व मुंबई विद्यापीठाचे माजी खेळाडू सुरेंद्र थोरवे हे यासंघाचे प्रशिक्षक म्हणून काम बघणार आहेत. ओम साई क्रीडा मंडल घाटकोपरचे संस्थापक धर्मेश चौरासिया हे व्यवस्थापक म्हणून काम पाहणार आहेत. तर मागील पर्वातील प्रशिक्षक अमित ताम्हणकर हे संघ प्रतिनिधी म्हणून संघासोबत असणार आहेत.
आर्यन वारीयर्स संघात घाटकोपर विभागातील अंकित घाग तर उपनगर विभागातील सुनील यादव हे दोन स्टार खेळाडु असणार आहेत. आर्यन वारीयर्स संघात अष्टपैलू खेळाडूंचा भरणा आहे.
आर्यन वारीयर्स
१) आकाश सकपाळ
२) अंकित घाग
३) विपुल चव्हाण
४) सागर काळे
५) तनय गुरव
६) सुनील यादव
७) ऋषिकेश घाडीगांवकर
८) प्रभू मूदलियार
९) अशफाक शेख
१०) समाधान घाग
११) जितेश कदम
१२) अभिषेक बागल
प्रशिक्षक: सुरेंद्र थोरवे
मॅनेजर: धर्मेश चौरासिया