भारताचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत याला त्याच्या यष्टीरक्षणाबरोबरच आक्रमक फलंदाजीसाठी ओळखले जाते. याबरोबरच तो त्याच्या भर मैदानातील मजेशीर विधानांमुळेही चर्चेत येत असतो. भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात ऍजबस्टन येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या टी२० सामन्यादरम्यानही तो अशाच गमीतीशीर विधानामुळे चर्चेत आला आहे.
तर झाले असे की, भारताकडून कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि पंत (Rishabh Pant) ही सलामी जोडी फलंदाजीसाठी उतरली. या दोघांनीही संघाला आक्रमक सुरुवात करून दिली. ४९ धावांची भागीदारी रचल्यानंतर रिचर्ड ग्लीसनने रोहितला बाद करत त्यांची भागीदारी मोडली. यादरम्यान भारतीय संघाच्या पहिल्याच षटकात पंत आणि रोहितमध्ये मजेशीर प्रसंग घडला.
भारताच्या डावातील पहिल्या षटकात डेविड विली (David Willley) गोलंदाजी करत होता. त्याच्या या षटकातील एका चेंडूवर पंतने हलक्या हातांनी मिड विकेटवर फटका मारला आणि तो एक धाव चोरण्यासाठी पळाला. तो वेगाने ही धाव पूर्ण करण्यासाठी पळाला असताना विली त्याच्या (Fielder Block Rishabh Pant’s Way) मार्गात आला. तरीही कसेबसे पंतने धाव पूर्ण केली.
आपली धाव पूर्ण झाल्यानंतर पंत रोहितला सांगतो की, ‘पुढे आला होता. टक्कर मारू काय?’
यावर भारतीय कर्णधारानेही गमतीशीर उत्तर दिले. रोहित पंतच्या विधानानंतर होकारार्थी उत्तर देत, ‘मार अजून काय‘ असे म्हणाला.
पंत आणि रोहितमधील या मजेशीर संभाषणाचा आवाज स्टंप माईकमध्ये कैद झाला असून याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. चाहते या प्रसंगाचा आनंद घेत आहेत.
https://twitter.com/time__square/status/1545764193101438978?s=20&t=_zjbVpXMJotAXBWKdxoMiQ
Rohit – "maar de aur kya"
— Saurabh Malhotra (@MalhotraSaurabh) July 9, 2022
दरम्यान पंत आणि रोहितने संघाला जलद सुरुवात करण्यात महत्त्वाची भूमिका निभावली. रोहित २० चेंडूत ३१ धावांची खेळी करून बाद झाला. या खेळीदरम्यान त्याने २ षटकार आणि ३ चौकार मारले. त्यातही डावातील पहिल्याच षटकात त्याने मारलेला खणखणीत षटकार लक्षवेधी राहिला. त्याला साथ देत पंतनेही १५ चेंडूत १ षटकार आणि ४ चौकारांच्या मदतीने २६ धावांची तुफानी खेळी केली.
रोहित-पंतच्या जोडीनंतर अष्टपैलू रविंद्र जडेजाने फिनिशरची भूमिका बजावली. त्याने २९ चेंडूत ४९ धावांची झंझावाती खेळी खेळत संघाला १७० धावांपर्यंत पोहोचवले. आपल्या या खेळीदरम्यान त्याने ५ चौकार मारले.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
इंग्लंड संघाचे कसोटीही टी२० प्रमाणे खेळण्याचे गुपित उलगडले, खुद्द बेयरस्टोने सांगितलंय
अखेर मुहूर्त लागला! तब्बल ६ वर्षांनंतर भारतीय संघ जाणार ‘या’ देशाच्या दौऱ्यावर
रविंद्र जडेजा आणि चेन्नई सुपर किंग्जचं ‘ब्रेकअप’? फ्रँचायझीकडून मोठं विधान आलं पुढे