भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार तसेच चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार एमएस धोनी हा आपल्या कारकीर्दीच्या अखेरच्या टप्प्यात आला आहे. असे असताना त्याची लोकप्रियता तसुभरही कमी न होता उलट अधिक वाढताना दिसतेय. आता त्यांच्या चाहत्यांमध्ये आणखी एक नाव सामील झाले आहे. तमिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी एका कार्यक्रमात धोनी समोरच आपल्या धोनीप्रेमाची कबुली दिली.
चेन्नई येथे नुकतीच तमिळनाडू चॅम्पियन्स फाउंडेशन या योजनेची सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून मुख्यमंत्री एमके स्टॅलिन तसेच मुख्य अतिथी म्हणून एमएस धोनी निमंत्रित होते. या योजनेअंतर्गत विविध खेळातील गुणवत्ता असलेले खेळाडू हेरून त्यांना मार्गदर्शन केले जाईल. या कार्यक्रमावेळी बोलताना स्टॅलिन म्हणाले,
“प्रामाणिकपणे सांगायचे झाल्यास तमिळनाडूतील इतर लोकांप्रमाणेच मी देखील धोनीचा मोठा चाहता आहे. तमिळनाडूने स्वीकारलेला हा मुलगा सीएसकेसाठी आणखी खेळावा अशी आमची इच्छा असेल. तो भारतातील करोडो लोकांसाठी प्रेरणा आहे. आम्ही तामिळनाडूमध्ये असे अनेक धोनी तयार करू इच्छितो. ते केवळ क्रिकेटच नव्हे तर इतर खेळांमध्ये देखील असतील.”
स्टॅलिन यापूर्वी देखील अनेकदा धोनीचे कौतुक करताना दिसले आहेत. ते अनेकदा चेन्नईच्या सामन्यांना थेट मैदानात उपस्थित राहतात. दुसरीकडे, धोनी हा आयपीएल इतिहासातील दुसरा सर्वात यशस्वी कर्णधार आहे. त्याने चेन्नई सुपर किंग्सला 2010, 2011, 2018 व 2021 असे चार वेळा विजेतेपद जिंकून दिले. या व्यतिरिक्त चेन्नई तब्बल 9 वेळा आयपीएलच्या अंतिम फेरीत सहभागी झाला आहे. या सर्व वेळी धोनी हाच चेन्नईचा कर्णधार राहिलाय.
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
केकेआरच्या विजयाने गुणतालिकेत खळबळ! मुंबईसह ‘हे’ संघ डू ऑर डाय स्थितीत, वाचा सविस्तर
“ईडन गार्डन्सवर रिंकू-रिंकू ऐकून अंगावर काटा येतो”, राणा-रसेलची दिलखुलास कबुली