भारत विरुद्ध बांगलादेश संघात वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेतील 17वा सामना खेळला जात आहे. पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडिअमवर हा सामना पार पडत आहे. या सामन्यात बांगलादेश संघाचा प्रभारी कर्णधार नजमुल होसेन शांतो याने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला. त्याचा हा निर्णय सलामी फलंदाजांनी सार्थ ठरवला. यासोबतच त्यांनी बांगलादेश संघासाठी एक विक्रम देखील रचला.
नियमित कर्णधार शाकिब अल हसन खेळत नसल्यामुळे त्याच्या जागी शांतोच्या खांद्यावर संघाची धुरा सोपवण्यात आली आहे. त्याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा घेतलेला निर्णय सलामीवीर लिटन दास व तंझीद हसन यांनी योग्य ठरवला. दोघांनी भारताच्या फॉर्ममध्ये असलेल्या गोलंदाजीला कोणतीही संधी न देता आक्रमक धोरण स्विकारले.
या जोडीने पहिल्या गड्यासाठी 93 धावांची भागीदारी केली. ही बांगलादेशसाठी वनडे विश्वचषकातील आजवरची सर्वोत्तम सलामीची भागीदारी केली. या पूर्वी हा विक्रम मेहराब व शहरियार यांच्या नावे होता. त्यावेळी त्यांनी पाकिस्तानविरुद्ध 69 धावा करत ही कामगिरी केली होती.
तंझीद याने आपल्या या खेळी दरम्यान वनडे क्रिकेटमधील आपले पहिले अर्धशतक पूर्ण केले. त्याने 43 चेंडूंमध्ये 51 धावांची खेळी केली. तर, लिटन दासने 82 चेंडूंमध्ये 66 धावा काढल्या.
(Tanzid Hasan And Litton Das Post Highest Opening Partnership In ODI World Cup)
हेही वाचा-
विराटमधील गोलंदाज मोठ्या काळानंतर झाला जागा, सहा वर्षांनंतर केली वनडेत गोलंदाजी । पाहा VIDEO
‘आमच्यावेळचा पाकिस्तान संघ वेगळा होता, आताचा…’, बाबरसेनेविषयी ‘दादा’चं रोखठोक वक्तव्य