IPL 2024: टाटा समूह पुढील पाच वर्षे आयपीएलचा टायटल स्पॉन्सर राहण्याची शक्यता आहे. टाटा सन्सने आयपीएल 2024 ते 2028 च्या टायटल प्रायोजकत्वासाठी दरवर्षी 500 कोटी रुपये म्हणजेच एकूण 2500 कोटी रुपयांची बोली लावली आहे. त्याची बोली आदित्य बिर्ला समूहाच्या बोलीशी जुळत आहे. अशा परिस्थितीत टाटा समूह जगातील या सर्वात मोठ्या क्रिकेट लीगचा टायटल स्पॉन्सर म्हणून कायम राहणार असल्याचे म्हटले जात आहे.
गेल्या वर्षी 12 डिसेंबर रोजी बीसीसीआयने या प्रायोजकत्वासाठी निविदा जारी केली होती. 14 जानेवारी रोजी आदित्य बिर्ला समूहाने यासाठी 2500 कोटी रुपयांची बोली लावली होती. आता शुक्रवारी (19 जानेवारी) संध्याकाळी बातमी आली की, टाटा समूहानेही तेवढीच रक्कम लावण्याचा निर्णय घेतला आहे.
टाटा समूह गेल्या दोन वर्षांपासून आयपीएलचा प्रायोजक आहे. आयपीएल 2022 आणि 2023 मध्ये प्रायोजकत्वासाठी टाटाने बीसीसीआयला 670 कोटी रुपये दिले. आता आयपीएलसाठी ही रक्कम वाढली आहे. याचे मुख्य कारण म्हणजे आयपीएलची वाढती क्रेझ तर आहेच, शिवाय येत्या सीझनमध्ये आयपीएल मॅचेसची संख्याही वाढणार आहे.आयपीएल 2024 मध्ये एकूण 74 सामने होणार आहेत. यानंतर, बीसीसीआयने आयपीएल 2025 मध्ये ते 84 आणि नंतर आयपीएल 2026 पासून 94 पर्यंत वाढवण्याची योजना आखली आहे.
आयपीएलचा पुढील हंगाम 21 मार्चपासून सुरू होण्याची शक्यता आहे. ही स्पर्धा 26 मेपर्यंत सुरू राहू शकते. याआधी महिला प्रीमियर लीगचेही आयोजन केले जाणार आहे. त्यासाठी फेब्रुवारीच्या मध्यापासून ते 10 मार्चपर्यंत ही स्पर्धा होऊ शकते. लोकसभा निवडणूक असूनही यावेळी आयपीएल भारतातच खेळवले जाण्याची शक्यता आहे. (Tata group will be the title sponsor of IPL A bid of so much thousand crores was placed for 5 years)
हेही वाचा
शमी-सूर्यानंतर आता बीसीसीआयने रिषभ पंतबाबत घेतला मोठा निर्णय, वाचाच
PAK vs NZ: ‘कबड्डी-कबड्डी’, न्यूझीलंडविरुद्ध शाॅर्ट धाव घेतल्यामुळे धवनने रिझवानची उडवली खिल्ली