द हंड्रेड मेन्स कॉम्पिटिशन 2023 स्पर्धेच्या 17व्या सामन्यात साऊथर्ण ब्रेव्ह संघाने वेल्स फायर संघाचा 9 गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना वेल्स फायर संघ निर्धारित 100 चेंडूत केवळ 87 धावा करू शकला. प्रत्युत्तरात साऊथर्न ब्रेव्ह संघाने अवघ्या 59 चेंडूत 1 गडी गमावून हे लक्ष्य गाठले. जॉर्ज गार्टेनला त्याच्या उत्कृष्ट गोलंदाजीसाठी सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. दरम्यान टायमल मिल्सने आपल्या वाढदिवशीच हॅट्रीक घेतली.
साऊथर्न ब्रेव्हच्या गोलंदाजांनी जबरदस्त गोलंदाजी केली. जॉर्ज गार्टेनने 15 चेंडूत केवळ 8 धावा देत 3 बळी घेतले. त्याचवेळी क्रेग ओव्हरटनने 19 धावांत 2 बळी घेतले. तर वेगवान गोलंदाज टायमल मिल्स (Tymal Mills) ने अवघ्या 12 धावांत 4 बळी घेतले. त्याने त्याच्या वाढदिवशी हॅट्रीकही घेतली आणि द हंड्रेडमध्ये हॅट्रीक घेणारा तो दुसरा गोलंदाज ठरला. शेवटच्या तीन चेंडूत सलग तीन विकेट घेत त्याने हॅट्रीक पूर्ण केली.
प्रथम फलंदाजी करताना वेल्स फायर संघाची फलंदाजी पूर्णपणे अपयशी ठरली. सलामीवीर जॉनी बेअरस्टो (Jonny Bairstow) खाते न उघडता तंबूत परतला. याशिवाय जो क्लार्कलाही खाते उघडता आले नाही आणि कर्णधार टॉम एबेलला केवळ 1 धाव करता आली. संघाकडून स्टीव्ह एस्किनाझीने सर्वाधिक धावा केल्या. त्याने 34 चेंडूत 38 धावांची खेळी खेळली. डेव्हिड विलीनेही 16 धावा केल्या पण बाकीचे फलंदाज पूर्णपणे अपयशी ठरले. संघ सतत विकेट गमावत राहिला आणि त्याचा परिणाम असा झाला की, संपूर्ण संघ अवघ्या 87 धावांत गारद झाला.
हे लक्ष्य साऊथर्न ब्रेव्हने सहज गाठले. फिन ऍलनने 22 चेंडूत 31 धावांची खेळी खेळली. त्याच्याशिवाय डेव्हन कॉनवेने 25 चेंडूत नाबाद 35 धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत 5 चौकार मारले. (taymal mills hattrick in the hundred mens competition 2023)
महत्वाच्या बातम्या-
वाद मिटला! स्वतः विराट म्हणाला, ‘बाबर जगात एक नंबर फलंदाज’, पहिल्या भेटीविषयी केला खुलासा
आशिया चषकापूर्वी रोहित सहकुटुंब बालाजी चरणी, कर्णधाराला पाहण्यासाठी चाहत्यांची तुंबळ गर्दी