---Advertisement---

निर्णायक चौथ्या कसोटीच्या आठवडाभरापूर्वीच इंग्लंडचा संघ जाहीर, खराब फॉर्मातील खेळाडूवर दाखवला विश्वास

On: बुधवार, जुलै 12, 2023 11:23 AM
England-Team
---Advertisement---

पाच कसोटी सामन्यांच्या ऍशेस मालिका 2023मधील 3 सामने पार पडले आहेत. या सामन्यांनंतर ऑस्ट्रेलिया 2-1ने मालिकेत आघाडीवर आहे. अशात इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील चौथा कसोटी सामना मॅनचेस्टर येथील ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर खेळला जाणार आहे. या सामन्यापूर्वी मंगळवारी (दि. 11 जुलै) इंग्लंडने 14 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे, यामध्ये कोणताही बदल झाला नाहीये.

इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया (England vs Australia) चौथ्या कसोटी सामन्यासाठी इंग्लंडचा यष्टीरक्षक जॉनी बेअरस्टो (Jonny Bairstow) प्लेइंग इलेव्हनमध्ये जागा मिळवण्यात यशस्वी झाला आहे. विशेष म्हणजे, बेअरस्टो फलंदाजी किंवा यष्टीरक्षण दोन्ही विभागात फॉर्ममध्ये नाहीये. त्यामुळे त्याच्या जागी बेन फोक्स याला संंघात सामील करण्याची मागणी केली जात होती. मात्र, संघ व्यवस्थापनाने बेअरस्टोवर विश्वास दाखवला आहे.

ऑली रॉबिन्सनही संघात सामील
दुसरीकडे, वेगवान गोलंदाज ऑली रॉबिन्सन तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी पाठीच्या दुखण्यामुळे मैदानाबाहेर गेला होता. तसेच, त्या सामन्यात फार खेळू शकला नव्हता. त्यालाही या संघात कायम ठेवण्यात आले आहे. मात्र, आता हेडिंग्लेमध्ये तिसऱ्या कसोटीत न खेळणाऱ्या जेम्स अँडरसन याला त्याच्या घरच्या मैदानावर पुनरागमनाची संधी मिळेल की नाही, हे इंग्लंड ठरवेल. तसेच, लॉर्ड्समध्ये पाच विकेट्स घेतल्यानंतर जोश टंगही प्रबळ दावेदार आहे.

ऑस्ट्रेलिया 2-1ने आघाडीवर
इंग्लंड संघाने तिसऱ्या कसोटीत 3 विकेट्सने विजय मिळवला होता. त्यापूर्वी ऑस्ट्रेलियाने मालिकेतील पहिले दोन सामने खिशात घातले होते. तसेच, मालिकेत 2-1ने आघाडी घेतली. कसोटी मालिकेच्या पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने 2 विकेट्सने, तर दुसऱ्या सामन्यात 43 धावांनी विजय मिळवला होता. त्यानंतर इंग्लंडने तीन विकेट्सने विजय मिळवत मालिकेत पुनरागमन केले. उभय संघातील चौथ्या कसोटीला 19 जुलैपासून सुरुवात होणार आहे.

चौथ्या ऍशेस सामन्यासाठी इंग्लंड संघ
बेन स्टोक्स (कर्णधार), मोईन अली, जेम्स अँडरसन, जॉनी बेअरस्टो (यष्टीरक्षक), स्टुअर्ट ब्रॉड, हॅरी ब्रूक, झॅक क्राऊले, बेन डकेट, डॅन लॉरेन्स, ऑली रॉबिन्सन, जो रूट, जोश टंग, ख्रिस वोक्स, मार्क वूड (team announced ashes 2023 england squads for fourth test see here)

महत्वाच्या बातम्या-
पत्नी साक्षीच्या ‘त्या’ वक्तव्यावर धोनीचे स्पष्टीकरण; म्हणाला, ‘मी पत्नीला तमिळ भाषेतील घाणेरडे शब्द…’
अर्जुन तेंडुलकरचं नशीब फळफळलं! IPLनंतर ‘या’ मोठ्या स्पर्धेत करणार आग ओकणारी गोलंदाजी, लगेच वाचा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---