आयपीएलच्या समाप्तीनंतर यूएई येथेच टी२० विश्वचषक स्पर्धा रंगणार आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना १४ नोव्हेंबर रोजी खेळला जाईल. यानंतर, अवघ्या दोनच दिवसात भारतीय संघाच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट हंगामाला सुरुवात होईल. विश्वचषकानंतर भारत न्यूझीलंड संघाचे यजमानपद स्वीकारेल. या दौऱ्यावर न्यूझीलंड संघ टी२० व कसोटी सामन्यांची मालिका खेळेल. टी२० मालिकेतील दुसरा सामना रांची येथे होणार असून, त्या सामन्यासाठी भारतीय संघ ज्या हॉटेलमध्ये थांबणार आहे तेथील फोटो व्हायरल झाले आहेत.
असा रंगणार न्यूझीलंडचा भारत दौरा
टी२० विश्वचषकाच्या समाप्तीनंतर न्यूझीलंड संघ भारत दौऱ्यावर येणार असून येथे ते ३ टी२० व २ कसोटी सामने खेळतील. १७ नोव्हेंबर रोजी जयपूर येथे टी२० मालिकेला सुरुवात होईल. त्यानंतर दुसरा सामना १९ नोव्हेंबरला रांची येथील झारखंड क्रिकेट संघटनेच्या मैदानावर खेळला जाईल. तिसरा सामना कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर २१ नोव्हेंबरला होईल. त्यानंतर अनुक्रमे कानपूर व मुंबई येथे कसोटी मालिका खेळली जाईल.
सर्व सुविधायुक्त हॉटेल तयार
टी२० मालिकेतील दुसरा सामना रांची येथे होणार असून, दोन्ही संघातील खेळाडू रॅडिसन ब्ल्यू हॉटेल येथे वास्तव्य करतील. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने हॉटेल प्रशासनाला ९० खोल्यांची मागणी केली होती, जी आता पूर्ण झाली आहे.
माध्यमांतील वृत्तांनुसार, बीसीसीआयने सुइट्स, सुपीरियर आणि बिझनेस क्लास रूम बुक केल्या आहेत. यामध्ये भारतीय संघाशी संबंधित लोकांची प्रोफाईलनुसार नियुक्ती केली जाईल. खेळाडूंसाठी सुइट्स आणि उत्कृष्ट खोल्या तयार करण्यात आल्या आहेत. भारतीय क्रिकेट संघाच्या कर्णधाराला प्रेसिडेंशियल सूटची खास रूम प्रदान केली जाते.
नवीन सोयीसुविधा उपलब्ध
माध्यमांमध्ये व्हायरल होत असलेल्या हॉटेलच्या छायाचित्रांमध्ये नवनवीन सोयीसुविधा खेळाडूंना उपलब्ध करून दिल्याचे दिसत आहे. भारतीय संघ १८ नोव्हेंबर रोजी येथे दाखल होईल.
त्याच्या पाच दिवस आधी या हॉटेलचे रूपांतर बायो-बबलमध्ये होईल. भारतीय संघासाठी अद्ययावत जिमची उभारणी केली असून, त्यामध्ये एकाच वेळी अनेक लोक मेहनत घेऊ शकतात.
महत्त्वाच्या बातम्या-
-Photo: आयपीएलमधून मिळाला छोटा ब्रेक; बुमराहने पत्नी संजनासह ‘अशा’प्रकारे घालवला वेळ
-अफलातून! सतरा वर्षीय शेफालीने पहिल्याच सामन्यात रॉकेट थ्रो मारून फलंदाजाला केले धावबाद; एकदा पाहाच
-खुर्चीवर दोरीने बांधून ठेवलेला दिसला विराट; नेटकरी म्हणे, ‘भारत असाच टी२० विश्वचषक जिंकेल’