सध्या भारतीय संघ वेस्ट इंडिज दौऱ्यावर असून उभय संघात 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील अखेरचा सामना खेळला जात आहे. या मालिकेनंतर वेस्ट इंडिज विरुद्ध भारत संघात वनडे आणि टी20 मालिकेचे आयोजन होणार आहे. विशेष म्हणजे, या मालिकेसाठी संघाची घोषणा करण्यापूर्वी असे म्हटले जात होते की, अनुभवी फलंदाज शिखर धवन या दौऱ्यासाठी पुन्हा राष्ट्रीय संघात पुनरागमन करेल. मात्र, असे काहीच घडले नाही. त्यामुळे धवन आणि त्याच्या चाहत्यांंच्या पदरी निराशा पडली. धवनने मेहनत करणे सुरू ठेवले आहे, जेणेकरून आगामी विश्वचषकासाठी त्याची संघात निवड केली जाईल. अशातच सोशल मीडियावर त्याने एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ भलताच जोरदार व्हायरल होत आहे.
शिखर धवन इंस्टाग्राम पोस्ट
खरं तर, बुधवारी (दि. 19 जुलै) शिखर धवन (Shikhar Dhawan) याने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओत धवन सोफ्यावर झोपल्याचे दिसत आहे. तसेच, तो यावेळी म्हणत आहे की, “मला वाटते की, कोणीतरी माझ्या संयमाच्या फळाचा रस बनवून प्यायला आहे.”
धवनने हा व्हिडिओ शेअर करत लक्षवेधी कॅप्शनही दिले आहे. या कॅप्शनमध्ये धवनने लिहिले की, “मला आशा आहे की, रस स्वादिष्ट असेल.”
https://www.instagram.com/reel/Cu4WpMxKEQu/
आता धवनच्या या मजेशीर व्हिडिओवर नेटकरी प्रेमाचा वर्षाव करत आहेत. या व्हिडिओवर लाईक्स आणि कमेंट्सचाही पाऊस पडत आहे. या पोस्टला आतापर्यंत 20 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तसेच, 4 लाख लाईक्स आणि 3 हजारांहून अधिक कमेंट्सही मिळाल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिले की, “त्याच्या हसण्यामागे खूप वेदना लपल्या आहेत.” दुसऱ्या एकाने कमेंट केली की, “ते इतर कुणी नसून बीसीसीआय आहे.” आणखी एकाने कमेंट केली की, “रोहित शर्माने पिऊन घेतले.”
धवनविषयी थोडक्यात
खरं तर, शिखर धवन अखेरचा आयपीएल 2023 (IPL 2023) हंगामात खेळताना दिसला होता. यामध्ये त्याने पंजाब किंग्स (Punjab Kings) संघाचे कर्णधारपद सांभाळले होते. 37 वर्षीय धवनने भारताकडून अखेरचा सामना डिसेंबर 2022मध्ये बांगलादेशविरुद्ध खेळला होता. तेव्हापासून धवन भारतीय संघातून बाहेर आहे. धवन सध्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये सराव करत आहे. आता हे पाहणे महत्त्वाचे ठरेल की, त्याला संघात पुनरागमनाची संधी मिळते की नाही. (team india batsman gabbar shikhar dhawan shares video instagram goes to viral)
महत्त्वाच्या बातम्या-
उपकर्णधारपद मिळताच धावा करायला विसरला रहाणे! दुसऱ्या कसोटीतही सपशेल फ्लॉप, संघाचे दरवाजे पुन्हा होणार बंद?
शुबमनचा तिसऱ्या क्रमांकावर खेळण्याचा निर्णय चुकला? विंडीजने दोन्ही वेळा दिल्या खोल जखमा