---Advertisement---

रोहित-विराट वादाविषयी निवडसमिती म्हणातायेत, “ते दोघे…”

On: शनिवार, जानेवारी 1, 2022 6:48 PM
virat-rohit
---Advertisement---

मागच्या काही दिवसांपासून भारतीय संघात (team india) महत्वाचे बदल केले गेल्याचे पाहायला मिळाले आहेत. विराट कोहलीने (virat kohli) टी२० संघाचे कर्णधारपद सोडल्यानंतर त्याच्याकडून एकदिवसीय संघाचे नेतृत्व देखील काढून घेतले गेले. रोहित शर्मा (rohit sharma) सध्या मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये भारताचा कर्णधार आहे. या सर्व घडामोडींमध्ये रोहित आणि विराट यांच्यातील वादाच्या अनेक चर्चा समोर आल्या आहेत. आता भारतीय संघाचे मुख्य निवडकर्ते चेतन शर्मा (chetan sharma) यांनी याबाबतीत स्पष्टीकरण दिले आहे.

विराट कोहली सध्या भारताच्या कसोटी संघाचे नेतृत्व करत आहे. त्याच्या नेतृत्वात दक्षिण अफ्रिकेविरुद्ध  संघाने पहिल्या कसोटी सामन्यात अप्रतिम विजय मिळवला. अशात चेतन शर्मांनी विराट आणि रोहित यांच्यातील वादाविषयी आलेल्या बातम्या आणि चर्चा चुकीच्या असल्याचे सांगितले आहे. एका क्रिकेट संकेतस्थळाशी बोलताना ते म्हणाले की, “दोन्ही खेळाडूंमध्ये गोष्टी अगदी सुरळीत आहे. त्यामुळे मी म्हणत आहे की, स्वतःचे अंदाज लावू नका. आम्ही आधी क्रिकेटपटू आहोत आणि त्यानंतर निवडकर्ते आहोत. या दोघांमध्ये कोणताच विवाद नाही.”

तत्पूर्वी, २०२१ टी२० विश्वचषक संपल्यानंतर विराट कोहलीने भारताच्या टी२० संघाचे कर्णधारपद स्वतःच्या इच्छेने सोडले होते. परंतु, त्यानंतर बीसीसीआयने त्याच्याकडून भारताच्या एकदिवसीय संघाचे कर्णधारपद देखील काढून घेतले. रोहित शर्माकडे या दोन्ही संघाच्या नेतृत्वची जबाबदारी आली. अशात या दोघांतील वादाविषयी अनेक बातम्या समोर आल्या होत्या. तसेच बीसीसीआय आणि विराटमध्येही सर्वकाही आलबेल नसल्याचे उघड झाले होते.

असे असले तरी, भारतीय संघ दक्षिण अफ्रिका दौऱ्यासाठी रवाना होण्यापूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेत विराटने रोहितशी त्याचा कसलाही वाद नसल्याचे स्पष्ट केले होते. विराट यावेळी म्हटला होता की, मागच्या २.५ वर्षापासून तो हिच गोष्ट सांगत आहे की, रोहित आणि त्याच्यामध्ये कसल्याही प्रकारचा वाद नाही. हे सांगून सांगून आता मी कंटाळलो आहे.

महत्वाच्या बातम्या –

विराट-अनुष्काने टीम इंडियासह नववर्षाचे केले स्वागत, फोटो होतायेत व्हायरल

जो रूटवर माजी इंग्लिश कर्णधाराची खरमरीत टीका; म्हणाला…

१ जानेवारी ही तारीख क्रिकेटविश्वात फक्त मायकल बेवनच्या ‘त्या’ खेळीसाठी ओळखली जाते

व्हिडिओ पाहा –

क्रिकेटमधील डक अन् त्याचे प्रकार | Explanation Of Duck In Cricket And Its Type

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---