नवी दिल्ली। आयपीएल २०२० मध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा विस्फोटक फलंदाज एबी डिविलियर्सने धडाकेबाजी कामगिरी केली आहे. त्याची ही खेळी पाहून त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये लवकरच पुनरागमन करण्याची मागणी होत आहे. खरंतर सोमवारी (१२ ऑक्टोबर) शारजाह येथे आयपीएल २०२० चा २८वा सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स संघात झाला. या सामन्यात ‘मिस्टर ३६०’ या नावाने प्रसिद्ध असलेल्या डिविलियर्सने ३३ चेंडूत ७३ धावांची तडाखेबंद खेळी केली होती. हा सामना बेंगलोरने ८२ धावांनी जिंकला होता.
रवी शास्त्रींनी केले ट्वीट
भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी डिविलियर्ससाठी एक खास ट्वीट केले आहे. त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये लिहिले की, “आपली निवृत्ती मागे घेत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्यासाठी ही चांगली वेळ आहे.” त्यांनी पुढे लिहिले की, “जे काही आम्ही पाहिले, ते आश्चर्यचकित करणारे होते. हे दर्शवते की तू आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये परतले पाहिजे.”
Now, that the penny has dropped. What one saw last night was unreal. And the feeling is the same waking up. @ABdeVilliers17, the game in these trying times or otherwise needs you back in the international arena and out of retirement. The game will be better off #RCBvKKR #IPL2020 pic.twitter.com/s9BG6MxiCv
— Ravi Shastri (@RaviShastriOfc) October 13, 2020
२०१८ मध्ये घेतली होती निवृत्ती
डिविलियर्सने मे २०१८ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. ज्यावेळी डिविलियर्सने निवृत्तीची घोषणा केली होती, तेव्हा कोणालाही यावर विश्वास बसत नव्हता. त्या दिवशी केवळ दक्षिण आफ्रिकाच नाही, तर संपूर्ण जगातील क्रिकेटप्रेमी नाराज झाले होते.
आयपीएलमध्ये डिविलियर्स गाजवतोय मैदान
आयपीएलच्या १३ व्या हंगामात तो चांगल्या फॉर्ममध्ये दिसत आहे. त्याने आतापर्यंतच्या ७ सामन्यात ५७ च्या सरासरीने २२८ धावा कुटल्या आहेत. या धावा करताना त्याने ३ अर्धशतके ठोकली आहेत. यादरम्यान त्याने २० चौकार आणि १३ षटकार मारले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
-अफलातून! डिविलियर्सने मारलेला चेंडू थेट मैदानाबाहेरील चालत्या कारवर, पाहा व्हिडिओ
-मिस्टर ३६०ची ‘ही’ करामत पाहून कोणताही गोलंदाज म्हणेल, याला बॉलिंग नकोच
ट्रेंडिंग लेख-
-आयपीएल २०२०: बेंगलोरने कोलकाताविरुद्ध मिळवलेल्या विजयानंतर अशी आहे गुणतालिका
-विरोधी संघ खुश..! आयपीएल २०२०मध्ये बिघडला या ३ स्टार खेळाडूंचा फॉर्म
-‘मिड सीजन ट्रान्सफर’चा फायदा घेत चेन्नई ‘या’ ३ खेळाडूंना घेणार का आपल्या संघात?