टीम इंडिया १८ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या ३ वनडे सामन्यांच्या मालिकेसाठी टीम इंडिया सध्या झिम्बाब्वे दौऱ्यावर आहे. मात्र, मालिकासुरू होण्याआधीच टीम इंडियासमोर आणखी एक समस्या निर्माण झाली आहे. सध्या हरारेमध्ये जलसंकट सदृश्य परिस्थिती आहे. अशा परिस्थितीत त्या ठिकाणी गेलेल्या भारतीय खेळाडूंमुळे तेथील नागरिकांना त्राय होऊ नये यासाठी बीसीसीआयने खेळाडूंवर काही नियम लादले आहेत.
राजधानी हरारेतील अनेक भागात गेल्या तीन दिवसांपासून पाणी येत नाही. अशा परिस्थितीत, पाण्याचे गंभीर संकट असताना, बीसीसीआयने टीम इंडियाचा कर्णधार केएल राहुल आणि इतर खेळाडूंना पाण्याची जास्तीत जास्त बचत करण्यास आणि आंघोळीसाठी कमी पाणी वापरण्यास सांगितले आहे.
महास्पोर्ट्सच्या व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
कोहलीच्या खराब फॉर्मबाबत सौरव गांगुलींचे मोठे विधान! म्हणाले, ‘त्याला फक्त…’
दु:खद! बीसीसीआयच्या माजी सदस्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू, झारखंडशी होते कनेक्शन