भारतीय संघाच्या माजी खेळाडूंपासून ते सध्या सक्रिय असणाऱ्या खेळाडूंपर्यंत अनेकांचा सोशल मीडियावर चांगलाच वावर असतो. खेळाडू त्यांच्या आयुष्यातील किस्स्यांपासून ते फोटो आणि व्हिडिओंपर्यंत अनेक गोष्टी चाहत्यांसोबत शेअर करत असतात. यामध्ये आता भारतीय संघाचे माजी दिग्गज खेळाडू सुनील गावसकर आणि यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक यांच्या नावाचाही समावेश झाला आहे. अशात दोघांनी एकमेकांसोबत डान्स करतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत ते ‘टम टम’ गाण्यावर एकमेकांना फलंदाजीच्या शॉट्सची ऍक्शन करताना दिसत आहेत.
खरं तर, भारतीय संघाने 13 मार्च रोजी बॉर्डर-गावसकर ट्रॉफी (Border-Gavaskar Trophy) आपल्या नावावर केली. अहमदाबाद येथे भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australia) संघात खेळला गेलेला चौथा कसोटी सामना अनिर्णित सुटला. यामुळे भारताने मालिका 2-1ने खिशात घातली. यादरम्यान समालोचन करत असलेले माजी दिग्गज सुनील गावसकर आणि दिनेश कार्तिक (Sunil Gavaskar And Dinesh Karthik) यांनीही भारताच्या विजयाचा जल्लोष केला. दोघेही तमिळ सिनेमा ‘एनिमी’ सिनेमातील ‘टम टम’ (Tum Tum) गाण्यावर थिरकले. त्यांचा व्हिडिओ आता जोरदार व्हायरल होत आहे.
खरं तर, दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) याने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत तो सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांच्यासोबत डान्स करताना दिसत आहे. यादरम्यान दोघे फलंदाजीचे शॉट्सही मारतानाही दिसत आहेत. हा व्हिडिओ शेअर करत कार्तिकने कॅप्शनमध्ये लिहिले की, “टी20 की कसोटी, तुम्ही कुणाच्या बाजूने आहात? एक लीजेंडसोबत मजेदार वेळ घालवला, जे खूपच विनम्र आणि मनाने युवा आहेत.”
https://www.instagram.com/reel/Cpury1JI18J/?utm_source=ig_embed&ig_rid=70f56819-f5e6-43a7-9ba0-5abd0c5b5790
दुसरीकडे, सुनील गावसकर यांनीही हा व्हिडिओ त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. दिग्गज गावसकरांनी हा व्हिडिओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, “ओपनर आणि फिनिशर.”
https://www.instagram.com/reel/CpwnzDkO-g-/?utm_source=ig_embed&ig_rid=df62f701-be36-49f5-bb71-3dd5a1f6199d
चाहत्यांना हे दोन्ही व्हिडिओ खूपच आवडल्याचे दिसत आहेत. त्यामुळे या व्हिडिओला 25 लाख व्ह्यूज मिळाले आहेत. तसेच, 5 लाखांहून अधिक लाईक्स आणि हजारो कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
भारतीय संघात पुनरागमन कठीण
दिनेश कार्तिकविषयी बोलायचं झालं, तर त्याने 2021मध्ये समालोचनाच्या दुनियेत पाऊल ठेवले होते. त्यानंतर त्याने 2022च्या आयपीएलमध्ये शानदार कामगिरी केली होती. त्यामुळे त्याला भारतीय संघात पुनरागमनाची संधी मिळाली होती. त्याने 2022च्या टी20 विश्वचषकात भारताचे प्रतिनिधित्व केले होते. मात्र, तो या मोठ्या स्पर्धेत अपेक्षित कामगिरी करू शकला नाही. त्यामुळे त्याचे संघातील पुनरागमन कठीण असल्याचे दिसत आहे. त्यानंतर त्याने नुकत्याच पार पडलेल्या बीजीटी (BGT) मालिकेत समालोचकाची भूमिका पार पाडली. दुसरीकडे, तो आता 31 मार्चपासून रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) संघाच्या जर्सीत आयपीएल 2023 (IPL 2023) खेळताना दिसणार आहे. (team india finisher dinesh karthik shared a funny reel with legend sunil gavaskar on instagram)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
हरमनप्रीत आहे WPLचे सलग 5 सामने जिंकणारी कर्णधार, पण IPLमध्ये अशी कामगिरी करणारा कॅप्टन कोण?
प्ले-ऑफचे तिकीट ते टेबल टॉपर, 5वा विजय मिळवताच मुंबईने केले ‘हे’ 4 कारनामे; क्रिकेटप्रेमींनी वाचाच