विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील वरिष्ठ भारतीय संघ सध्या इंग्लंडमध्ये आहे. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या दुसऱ्या हंगामासाठी भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावरून सुरुवात करेल. भारत या दौऱ्यामध्ये इंग्लंडविरुद्ध पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळेल. गेली अनेक दिवस डरहॅममध्ये असलेला शुक्रवारी (३० जुलै) भारतीय संघ पहिल्या कसोटीसाठी नॉटिंघमकडे रवाना झाला. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) याबाबत अधिकृत ट्विट करत माहिती दिली.
डरहॅम येथे सराव करत होता भारतीय संघ
जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात पराभूत झाल्यानंतर भारतीय संघाला २४ जून ते १२ जुलै या काळात सुट्टी देण्यात आली होती. १३ जुलैपासून इंग्लंड दौऱ्यावर असलेले सर्व खेळाडू डरहॅम येथे एकत्रित झाले. भारतीय संघाने डरहॅम येथील रिव्हर साईड मैदानावर काउंटी एकादश संघाविरुद्ध तीन दिवसीय सराव सामना देखील खेळला. त्यानंतर, भारतीय संघ शुक्रवारी पहिल्या कसोटीसाठी नॉटिंघमकडे रवाना झाला.
बीसीसीआयने दिली माहिती
भारतीय संघ नॉटिंघमला रवाना झाल्याची बातमी बीसीसीआयने ट्विटरवरून दिली. या ट्विटमधील छायाचित्रात डरहॅम संघाने भारतीय संघाचे आभार मानलेले दिसत आहेत. या ट्विटला कॅप्शन देताना लिहिले, ‘धन्यवाद डरहॅम क्रिकेट! आम्ही येथील काळ चांगला व्यतीत केला.’
Thank you @DurhamCricket for having us over. We enjoyed our time here 🙌🙌 https://t.co/uQCXryt4Te pic.twitter.com/EiFehCpN2H
— BCCI (@BCCI) July 30, 2021
डरहॅम क्रिकेटने देखील रिषभ पंत व अक्षर पटेल यांचे डरहॅम क्रिकेट संघाची जर्सी पकडलेले छायाचित्र आभार मानण्यासाठी व्यक्त केले. भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध ४ ऑगस्टपासून नॉटिंघम येथे कसोटी मालिकेला सुरुवात करेल.
इंग्लंड विरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघ-
विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), रोहित शर्मा, अभिमन्यू ईस्वरन, पृथ्वी शॉ, केएल राहुल, वृद्धिमान साहा, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, रिषभ पंत, आर अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, सूर्यकुमार यादव, भुवनेश्वर कुमार, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर व उमेश यादव.
महत्त्वाच्या बातम्या-
‘द हंड्रेड’ लीगमध्ये भारतीय महिलांचा जलवा, जेमिमा टॉप रन स्कोरर; तर स्म्रीती-हरमनप्रीतही लयीत
व्वा रे पठ्ठ्या! मिचेल स्टार्कच्या भावाने टोकियो ऑलिंपिकमध्ये दाखवला दम, मिळवले फायनलचे तिकीट