भारतात क्रिकेट हा एक खेळ नसून भारतीय लोकांच्या जीवनाचा एक अविभाज्य घटक आहे. भारतीय क्रिकेटप्रेमी नेहमीच भारतीय खेळाडूंन फॉलो करत असतात. त्यांनी कसे कपडे घातले, ते कुठे फिरायला गेले किंवा त्यांची प्रेमकथा, वाढदिवस अशा खूप गोष्टी क्रिकेटप्रेमींना जाणून घ्यायच्या असतात. भारतात क्रिकेटला खूप महत्व दिलं जात. तसेच तो खेळ खेळणाऱ्या खेळाडूंना सुद्धा तितकेच महत्व देतात. आजच्या या लेखातून जाणून घेऊया अशाच एका भारताच्या माजी कर्णधाराच्या आलिशान घराबद्दल.
भारतीय संघाचा फलंदाज आणि माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनीचे झारखंड मधल्या रांचीमध्ये आलिशान घर आहे. धोनीची बायको साक्षीने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंट वरून आपल्या राहत्या घराचे सुंदर फोटो आणि छायाचित्रण टाकले. साक्षीने छायाचित्रण करून आपल्या अलिशान फार्महाउसचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर टाकला. त्यावर धोनीच्या असंख्य चाहत्यांनी प्रतिक्रिया देत त्यांच्या फार्महाउसची स्तुती केली. काही चाहत्यांनी आम्हाला ‘धोनी भाई’ दाखव अशा सुद्धा प्रतिक्रिया दिल्या आहेत.
https://www.instagram.com/p/CP0v2SSnJ7e/?utm_source=ig_embed&utm_campaign=embed_video_watch_again
धोनीच्या फार्महाउसमध्ये एक मोठा स्विमिंग पूल आहे. आणि इनडोअर खेळ खेळण्यासाठी एक स्टेडियमसुद्धा आहे. आतमध्ये धोनीने स्वत:साठी जिम सुद्धा चालू केली आहे. भारतीय संघाचे जवळ जवळ सगळेच खेळाडू धोनीच्या फार्महाउस वर येऊन गेले आहेत.
धोनी सुद्धा प्राणी प्रेमी आहे, हे आपण सोशल मिडियाच्या माध्यमांतून पाहतच असतो. म्हणून धोनीने फार्महाउसच्या लाउंज मध्ये त्याचे आवडते प्राणी ठेवले आहेत. धोनी त्यांना तिथेच प्रशिक्षण सुद्धा देतो. खूप वेळा धोनीने कुत्र्यांना प्रशिक्षण देताना आपण पहिले आहे. धोनीच्या फार्महाउसच्या चारही बाजूला आपणास हिरवळ पाहण्यास मिळते. फार्महाउसच्या चारही बाजूला वेग वेगळ्या झाडांचे आणि फुलांचे प्रकार पाहण्यास मिळतात.
धोनी बाईक्स आणि कारचा खूपच शौकीन आहे. धोनीला बाईक्स आणि कार जमा करू ठेवायला खुप आवडते. घरात त्याने त्यासाठीही वेगळी जागा केली आहे. धोनीकडे जवळ जवळ २०-२५ बाईक्स असतील आणि त्या सोबत १०-१२ कार सुद्धा आहेत. त्याच्याकडे जुन्या काळातल्या गाड्या सुद्धा आहे ज्या त्याने केवळ प्रदर्शनासाठी ठेवला आहे. धोनीने हल्लीच महाराष्ट्रातील पुणे या ठिकाणी सुद्धा नवीन घर घेतले आहे. धोनी मुंबई किंवा पुण्याला आल्यास तो वास्तव्याला त्याच घरी असतो.
महत्त्वाच्या बातम्या-
पुजारा, कोहली की विलियम्सन, WTC Finalमध्ये कोण घालणार धावांचा रतीब? दिग्गजांनी दिली उत्तरे
धोनीला संघाबाहेर करणाऱ्या माजी निवडकर्त्याने भाष्य; म्हणे, ‘दिग्गजांविरुद्ध निर्णय घ्यावे लागतात’