यावर्षी श्रीलंकेत आयोजित केलेला आशिया चषक आता काही कारणास्तव यूएईत खेळवला जाणार आहे. स्पर्धेची सुरुवात २७ ऑगस्टपासून होईल. यावर्षी एकूण ६ संघ आशिया चषकात सहभागी होतील, ज्यांना दोन ग्रुपमध्ये विभागले गेले आहे. भारत आणि पाकिस्तान एकाच ग्रुपमध्ये आहेत. २८ जुलै रोजी एकमेकांविरुद्धच्या सामन्यातून हे दोन्ही संघ आशिया चषकाच्या अभियानाची सुरुवात करतील.
ही चौथी वेळ आहे जेव्हा यूएईमध्ये आशिया चषकाचे आयोजन केले गेले आहे. यापूर्वी यूएईत खेळवले गेलेले आशिया चषक एकदिवसीय प्रकारातील होते. एवढेच नाही, प्रत्येक वेळी भारतीय संघाने याठिकाणी विजेतेपद पटकावले आहे. मागच्या ३८ वर्षांमध्ये भारतीय संघाची यूएईतील आकडेवारी कामलीची राहिली आहे. अशात रोहित शर्माच्या नेतृत्वातील भारतीय संघाला त्यांचा हा विजयीरथ यावर्षीही पुढे न्यावा लागेल.
लीग स्टेडमधील प्रदर्शनामुळे मिळालेले विजेतेपद (१९८४) –
यूएईमध्ये १९८४ साली पहिल्यांदा आशिया चषकाचे आयोजन केले गेले होते. परंतु, या स्पर्धेत अंतिम सामना खेळवला गेला नव्हता. लीग स्टेजमधील संघांचे प्रदर्शन पाहून विजेता संघ निवडला गेला होता. भारत, पाकिस्तान आणि श्रीलंका संघ या स्पर्धेत उतरले होते. भारताने पाकिस्तानने ५४ आणि श्रीलंकन संघाला १० विकेट्सने पराभूत केले होते. पाकिस्तानने दोन सामन्यात पराभव स्वीकारला होता.
श्रीलंकेला मात देऊन जिंकलेले विजेतेपद (१९९५) –
त्यानंतर १९९५ साली यूएईमध्ये दुसऱ्यांदा आशिया चषकाचे आयोजन केले गेले. यावेळी एकूण ७ संघ स्पर्धेत सहभागी झाले होते. लीग स्टेजच्या सामन्यांमध्ये भारताने ३ पैकी २ सामने जिंकले आणि गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर राहिला. भारताने बांगलादेश आणि श्रीलंका संघाला मात दिली होती. दुसरीकडे पाकिस्तानने मात्र ९७ धावांनी भारतीय संघाला धूळ चारली होती. असे असले तरी, पाकिस्तान संघ अंतिम सामन्यात पोहचू शकला नाही.
अंतिम सामन्यात भारत आणि श्रीलंका संघ भिडले. प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेन संघाने ७ विकेट्सच्या नुकसानावर २३० धावांची खेळी गेली. प्रत्युत्तरात भारतीय संघाने ४१.५ षटकांमध्ये २ विकेट्स गमावून विजय मिळवला. नवजोत सिंग सिद्धूने ८४ आणि मोहम्मद अजरुद्दीनने ९० धावांची महत्वपूर्ण खेळी केली होती.
बांगलादेशविरुद्धच्या अंतिम सामन्यात मिळवलेला विजय (२०१८) –
यूएईत शेवटचा आशिया चषक खेळला गेला तो म्हणजे २०१८ साली. एकूण ६ संघ यावर्षी स्पर्धेत सामील झाले होते. संघांनी लीग स्टेजमध्ये दोन सामने जिंकले आणि पाकिस्तानला ८ विकेट्सने मात दिली. त्यानंतर सुपर ४ स्टेजमध्ये खेळलेल्या तीन सामन्यांपैकी २ सामने भारताने जिंकले. भारताने बांगलादेशला ७ विकेट्सने, तर पाकिस्तानला ९ विकेट्सने पराभूत केले होते. अफगाणिस्तानसोबतचा सामना निकाली निघू शकला नव्हता.
अंतिम सामना भारत आणि बांगलादेश यांच्यात खेळला गेला होता. बांगलादेशने प्रथम फलंदाजी करताना एकूण २२२ धावा केल्या. कुलदीप यादवने या निर्णायक सामन्यात एकूण ३ विकेट्स घेतल्या. भारताने हे लक्ष्य शेवटच्या गाठले. यासाठी भारताच्या ७ खेळाडूंनी विकेट्स गमावल्या. रोहित शर्माने सर्वाधिक ४८ विकेट्स घेतल्या.
इतिहासात दुसऱ्यांचा टी-२० फॉरमॅटमध्ये खेळला जाणार आशिया चषक –
यावर्षी खेळला जाणारा आशिया चषका टी-२० प्रकारातील असून या फॉरमॅटमध्ये दुसऱ्यांदा ही स्पर्धा खेळली जात आहे. याआदी २०१६ साली बांगलादेशमध्ये पार पडलेला आशिया चषक २० फॉरमॅट मधील होता. तेव्हाही भारताने अंतिम सामन्यात बांगलादेशला ८ विकेट्सने मात दिलेली आणि विजेतेपद पटकावले होते. बांगलादेशने दिलेले १२० धावांचे लक्ष्य १३.५ षटकात आणि २ विकेट्सच्या नुकसानावर भारताने गाठले होते. शिखर धवनने यावेळी ४० चेंडूत ६० धावा कुटल्या होत्या.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
आशिया कप क्वालिफायर्सचे वेळापत्रक झाले जाहीर; हे चार संघ भारत-पाकिस्तानशी भिडण्याचे दावेदार
पाचव्या टी-२०त विश्रांती घेतल्यामुळे सूर्यकुमारला झटका! आयसीसी क्रमवारीत पॉईंट्सने केला घात
भारतीय महिला संघाच्या प्रदर्शनावर बोट उचलल्याने गांगुली होतोय ट्रोल, चाहते घेतायत समाचार