भारतीय क्रिकेट संघ आपल्या नव्या प्रशिक्षक गौतम गंभीर सोबत पहिल्यांदाच विदेश दौऱ्यावर जाणार आहे. माजी प्रशिक्षक राहुल द्रविडचा टीम इंडियासोबतचा कार्यकाळ संपल्यानंतर हेड कोचपदी गाैतम गंभीरची नियुक्ती करण्यात आली होती. टीम इंडियाला या महिन्याच्या अखेरीस श्रीलंकेचा दौरा करायचा आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी म्हणजेच 22 जुलै रोजी नवीन प्रशिक्षक गाैतम गंभीर आणि मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांच्यासोबत पत्रकार परिषद घेणार आहेत.
भारतीय संघ नवीन प्रशिक्षक गौतम गंभीरसोबत आपल्या पहिल्या मिशनसाठी रवाना होण्यासाठी सज्ज झाला आहे. 27 जुलैपासून सुरू होणाऱ्या टी-20 आणि एकदिवसीय मालिकेसाठी संघाची निवड करण्यात आले आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, भारतीय संघाची कमान हाती घेण्यापूर्वी, प्रशिक्षक गौतम गंभीर आणि मुख्य निवडकर्ता अजित आगरकर 22 जुलै रोजी पत्रकार परिषदेत भेटतील. भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी ते प्रथमच माध्यमांसमोर येणार आहेत.
22 जुलै रोजी मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी मीडियासमोर उपस्थित राहणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय संघ त्याच दिवशी श्रीलंका दौऱ्यावर रवाना होणार आहे. भारताला 3 टी-20 आणि त्यानंतर तेवढ्याच एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळायची आहे.
श्रीलंकेदाैऱ्यासाठी भारतीय संघाचे वेळापत्रक
27 जुलै – पहिला टी20, संध्याकाळी 7 वाजता, पल्लेकेले
28 जुलै – दुसरी टी20, संध्याकाळी 7 वाजता, पल्लेकेले
30 जुलै – तिसरी टी20, संध्याकाळी 7 वाजता, पल्लेकेले
2 ऑगस्ट – पहिली वनडे, दुपारी 2.30 वाजता, कोलंबो
4 ऑगस्ट – दुसरी वनडे, दुपारी 2.30 वाजता, कोलंबो
7 ऑगस्ट – तिसरी वनडे, दुपारी 2.30 वाजता, कोलंबो
भारतीय टी20 संघ:
सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, रिंकू सिंग, रियान पराग, रिषभ पंत (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, खलील अहमद, मोहम्मद सिराज.
भारताचा एकदिवसीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, केएल राहुल, रिषभ पंत (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर, शिवम दुबे, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंग, रायन पराग, अक्षर पटेल, खलील अहमद, हर्षित राणा.
महत्त्वाच्या बातम्या-
IPL 2025: मेगा ऑक्शनपूर्वी बीसीसीआय आणि संघ मालक येणार एकत्र; पाहा बैठकीचा मुख्य अजेंडा
हरमनप्रीत कौरला मागे टाकत ‘स्टार’ खेळाडू स्म्रीती मानधनानं रचला इतिहास!
आयपीएल 2025 पूर्वी केएल राहुल परतणार RCBच्या ताफ्यात?