---Advertisement---

WTC Final: विराटची प्रतिक्षा संपणार, शुबमन-अजिंक्यही शतक ठोकणार; गुरुजींचा ‘३ सूत्री फॉर्मूला’ कमाल करणार!

On: शनिवार, मे 22, 2021 7:54 AM
---Advertisement---

क्रिकेटरसिकांना सध्या येत्या जून महिन्यात होणाऱ्या विश्व कसोटी अजिंक्यपद अंतिम सामन्याची प्रतिक्षा लागली आहे. १८ ते २२ जून या कालावधीत इंग्लंडमधील द रोज बाउल स्टेडियम, साउथम्पटन येथे भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात हा महामुकाबला रंगणार आहे. दोन तुल्यबळ संघ आमनेसामने येणार असल्याने अतिशय अटीतटीची लढत या सामन्यात पाहायला मिळणार आहे.

उभय संघांनी या मोठ्या सामन्यासाठी तयारीही सुरू केली आहे. अशात भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी भारतीय फलंदाजांसाठी ‘३ सूत्री फॉर्मूला’ तयार केला असल्याचे समजत आहे.

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याला शतकाची प्रतिक्षा आहे. त्याने मागील १३ कसोटी डावांपासून शतक झळकावलेले नाही. दुसरूकडे युवा सलामीवीर शुबमन गिल यालाही त्याच्या पहिल्या शतकाची आस आहे. याबरोबरच भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे यानेही त्याच्या मागील ५० कसोटी डावात केवळ ३ शतके केली आहेत. थोडक्यात सांगायचे झाले तर, हिटमॅन रोहित शर्माला वगळता भारतीय कसोटी संघातील इतर फलंदाजांनी बऱ्याच काळापासून शतकी खेळी केलेली नाही.

त्यातही न्यूझीलंडविरुद्धचा कसोटी अजिंक्यपद अंतिम सामना भारतीय संघासाठी अतिशय चुरशीचा असणार आहे. अशात भारतीय फलंदाजांच्या मोठ्या खेळी संघाला मजबूत स्थितीत आणू शकतात. यासाठीच प्रशिक्षक शास्त्री ३ वेगवेगळ्या पद्धतींवर काम करणार असल्याचे टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तात लिहिले आहे.

काय आहे रवी शास्त्रींचा ‘३ सूत्री फॉर्मूला’?
भारतीय क्रिकेटपटूंच्या फलंदाजीला अधिक धार आणण्यासाठी शास्त्री खेळपट्टीच्या लांबीवर काम करणार आहेत. २२ यार्डच्या खेळपट्टीऐवजी १६ यार्डच्या खेळपट्टीवर भारतीय फलंदाजांचे सराव सत्र घेण्याची त्यांची योजना आहे. यामुळे फलंदाज कमी वेळेत चेंडूला समजून घेऊ शकतील. परिणामत: भारतीय फलंदाज गतीशील फलंदाजी करतील.

दुसरे म्हणजे, शास्त्री नेट्समध्येच चमकदार चेंडूचा वापर करणार आहेत. जेणेकरुन ड्यूक चेंडूने अंतिम सामन्यात खेळण्यापुर्वी केव्हा आणि कोठे चेंडूवर शॉट खेळणे योग्य असेल?, याचा अंदाज भारतीय फलंदाजांना येईल.

तिसरे म्हणजे, चेंडूला सोडण्याच्या शैलीला धार देणे. यामुळे भारतीय फलंदाजांना सामन्यादरम्यान कोणत्याही परिस्थितीशी ताळमेळ साधता येईल. याबरोबरच प्रतिस्पर्धी संघाच्या वेगवेगळ्या क्षेत्ररक्षणाशी जुळवून घेण्यातही त्यांना मदत होईल.

महत्त्वाच्या बातम्या-

विराट आणि रोहितमध्ये खरोखरच वाद आहे का? स्वतः रोहितच्या बालपणीच्या प्रशिक्षकांनी दिले उत्तर

सचिन तेंडुलकरने प्रचंड वेदनेत असून देखील खेळली होती ‘ती’ सिरीज, रॉबिन उथप्पाने केला खुलासा

बुढ्ढा होगा तेरा बाप! ४५ वर्षाच्या ‘या’ खेळाडूने पाडला १५ चौकार आणि १५ षटकारांचा पाऊस

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---