---Advertisement---

टीम इंडियाचा ‘आफ्रिकी पाहुणचार’, ६० हेक्टरमध्ये परसलेल्या आलिशान रिसॉर्टमध्ये आहे विराट अन् कंपनीचा डेरा

On: शुक्रवार, डिसेंबर 17, 2021 11:01 PM
Team India And Hotel
---Advertisement---

भारतीय संघ (team india) दक्षिण अफ्रिकेत दाखल झाला आहे. दक्षिण अफ्रिका दौऱ्यात भारतीय संघाला तीन सामन्यांची कसोटी आणि तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळायची आहे. कोरोनाच्या ओमिक्रॉन विषाणूच्या पार्श्वभूमीवर उभय संघातील टी-२० मालिका रद्द केली गेली होती, पण कसोटी आणि एकदिवसीय मालिका खेळली जाणार आहे. भारतीय संघ सध्या दक्षिण अफ्रिकेत विलगीकरणात आहे. ज्याठिकाणी संघाची राहण्याची व्यवस्था केली गेली आहे, ते रिसॉर्ट खूप मोठ्या जागेत पसरलेले आहे. खेळाडूंनी या सुंदर रिसॉर्टमधून फोटो शेअर करायला सुरुवात देखील केली आहे.

भारतीय संघ सध्या दक्षिण अफ्रिकेतील प्रिटोरियामध्ये विलगीकरणात आहे. प्रिटोरियाच्या आयरीन कंट्री लॉज (irene country lodge) याठिकाणी संघाची राहण्याची व्यवस्था केली गेली आहे. विलगीकरणाचा कालावधी पूर्ण करून संघ सेंचुरियनला जाणार आहे आणि त्याठिकाणी संघाला पहिला कसोटी सामना खेळायचा आहे. भारतीय संघाची व्यवस्था करण्यासाठी मागच्या काही दिवसांपासून या रिसॉर्टला बंद ठेवण्यात आले होते.

भारतीय संघ या रिसॉर्टमध्ये पोहचल्यानंतर सर्व खेळाडूंची कोरोना चाचणी करण्यात आली. रिसॉर्टच्या कर्मचाऱ्यांनी खास डान्स करून संघाचे स्वागत देखील केले. आयरिन कंट्री लॉज हे प्रिटोरियाच्या सर्वोत्कृष्ट रिसॉर्टपैकी एक आहे. या रिसॉर्टमध्ये हॉटेल, रेस्टोरंट, स्पा, मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन अशा सुविधा आहेत. हे रिसॉर्ट तब्बल ६० हेक्टर परिसरात पसरलेले आहे.

याठिकाणी पर्यटनासाठी वेगळी जागा बनवली गेली आहे. तसेच फॉरेस्ट व्यू, लेक व्यू आणि गोल्फ कोर्स देखील आहे. रिसॉर्टच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीप्रमाणे फॉरेस्ट व्यूच्या खोलीचे एका रात्रीचे भाडे १२ ते १५ हजार रुपये आहे.

भारतीय संघातील अनेक खेळाडूंनी या रिसॉर्मटध्ये दाखल झाल्यानंतर स्वतःचे फोटो शेअर केले आहे. रिषभ पंत, चेतेश्वर पुजारा यांनी अधिकृत इंस्टाग्राम खात्यावरून स्टोरी शेअर केली आहे. तसेच कसोटी कर्णधार विराट कोहलीची पत्नी अनुष्षा शर्मा हिने देखील इंस्टाग्रामवर स्टोरी शेअर केली आहे.

दरम्यान, दक्षिण अफ्रिकेविरुद्धची कसोटी मालिका २६ डिसेंबरपासून सुरू होणार आहे. मालिकेतील दुसरा कसोटी सामना ३ जानेवारीपासून आणि तिसरा सामना ११ जानेवारीपासून खेळला जाईल. कसोटी मालिका संपल्यानंतर उभय संघात तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेला १९ जानेवारीपासून सुरुवात होईल.

महत्त्वाच्या बातम्या-

भारताचा पाकिस्तानवर दणदणीत विजय! पाकिस्तानला आधी पळपळ पळवलं, अगदी रडवलं आणि शेवटी हरवलंच

चप्पल, चार्जर, शेकर; ईशांतची सामानाने खचाखच भरलेली बॅग पाहून विराट म्हणे, ‘जो कोणी हिला घेऊन पळून…’

फलंदाज, कर्णधार ते गुरू; रोहितचं एनसीएमध्ये युवा शिलेदारांना मोलाचं मार्गदर्शन, फोटो व्हायरल

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---