भारत विरुद्ध बांग्लादेश यांच्यतील खेळल्या जात असलेलया कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात अश्विनने शानदार फलंदाजी केली. अश्विनने पहिल्या दिवशी दमदार शतक झळकावून भारताची संकटातून सुटका केली. यावेळी त्याने रवींद्र जडेजासोबत सातव्या विकेटसाठी 199 धावांची भागीदारी करून सामन्यात संघाचे पुनरागमन केले. रविचंद्रन अश्विनने शुक्रवारी सांगितले की, मी बाह्य आणि अंतर्गत दबावातून स्वतःला मुक्त केले आहे आणि आता चेहऱ्यावर हास्य ठेवून क्रिकेट खेळायचे आहे.
या 38 वर्षीय खेळाडूने आपल्या परिपक्व फलंदाजीने हे सिद्ध केले की तो दबाव परिस्थिती हाताळण्यास पूर्णपणे सक्षम आहे. सामन्याच्या दुसऱ्या दिवसानंतर पत्रकार परिषदेत बोलताना अश्विन म्हणाला, ‘मी दडपणाचा आनंद घेतो. त्यात कोणताही शंका नाही. जे तुम्हाला शक्य तितके प्रयत्न करण्याची संधी देते. पूर्वी अशा परिस्थितीत मी स्वतःची आणि इतरांची टीका करायचो. मी स्वतःवर खूप दबाव आणायचो’.
पुढे तो म्हणाला, ‘मी नेहमीच धैर्याने दबावाचा सामना केला. आता जरी मी खूप बदललो असलो तरी मला चेहऱ्यावर हसू घेऊन क्रिकेट खेळायचे आहे. मी चार-पाच वर्षांपूर्वी स्वत:ला वचन दिले होते की मी कोणावरही प्रतिक्रिया देणार नाही आणि आता मी त्याचे योग्य पालन करत आहे.
चेन्नईच्या या खेळाडूने असेही सांगितले की, गेल्या तीन वर्षांत त्याने आपल्या फलंदाजीवर खूप लक्ष दिले आहे जेणेकरून तो संघासाठी अधिक योगदान देऊ शकेल. तो म्हणाला, ‘मी यावर (फलंदाजी) खूप काम केले आहे. मी माझ्या शाॅट्समध्ये खूप सुधारणा केली आहे. ज्या प्रकारे मी वेगवान गोलंदाजांचा सामना करतो. त्याचे परिणाम मिळत आहेत याचा मला आनंद आहे. यातून मला खूप समाधान मिळत आहे.
हेही वाचा-
इरफान पठाणने शेवटच्या चेंडूवर सामना जिंकवला; अंबाती रायडू, रॉबिन उथप्पा फ्लॉप
5 दिग्गज खेळाडू ज्यांना संघातून कधीही वगळण्यात आले नाही
बर्थडे बॉय राशिद खानचा विश्वविक्रम! 53 वर्षांच्या वनडे इतिहासात अशी कामगिरी करणारा पहिला गोलंदाज