---Advertisement---

IND vs NZ: दुर्दैवीचं म्हणावं..! रोहित शर्माची अनलकी विकेट; पाहा VIDEO

On: शुक्रवार, ऑक्टोबर 18, 2024 4:37 PM
---Advertisement---

ind vs nz test; रोहित शर्माने न्यूझीलंडविरुद्धच्या बेंगळुरू कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात अर्धशतक झळकावले. रोहितने टीम इंडियासाठी दमदार कामगिरी करत 52 धावा केल्या. मात्र, यानंतर तो चुकून बाद झाला. एका चुकीमुळे रोहितने त्याची विकेट गमावली.  एजाज पटेलच्या फिरकी चेंडूवर रोहितने चेंडू डिफेन्स केला पण चेंडू मागे फिरून स्टंपला लागला. चांगल्या लयीत खेळत असताना रोहित शेवटी दुर्दैवी पध्दतीने बाद झाला.

टीम इंडियाच्या दुसऱ्या डावात रोहित आणि यशस्वी जयस्वाल सलामीला आले. यादरम्यान रोहितने 63 चेंडूंचा सामना करत 8 चौकार आणि 1 षटकार लगावला. रोहित 52 धावा करून बाद झाला. एजाज पटेल न्यूझीलंडसाठी डावातील 22 वा षटक टाकण्यासाठी आला. ओव्हरच्या पाचव्या चेंडूवर त्याने रोहितची विकेट घेतली. वास्तविक रोहितने या चेंडूचा चांगला बचाव केला होता. पण चेंडू मागे जाऊन स्टंपला लागला. अशात रोहितची विकेट गेली. दुर्दैवी पध्दतीने बाद झाल्यानंतर कर्णधार रोहित शर्माला निराशाजनक पध्दतीने मैदान सोडावे लागले.

 

पहिल्या डावात अवघ्या 46 धावा करून टीम इंडिया ऑलआऊट झाली. पण आता टीम इंडिया दुसऱ्या डावात चांगली कामगिरी करत  आहे. या बातमी आखेरीस टीम इंडियाने 2 गडी गमावून 197 धावा केल्या होत्या. विराट कोहली 4 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 50+ धावा करून खेळत होता. सर्फराज खान 55+ धावा करून खेळत होता. त्याने 3 षटकार आणि 5 चौकार मारले. तत्पूर्वी, यशस्वी जयस्वाल 35 धावा करून बाद झाला. ज्यामध्ये त्याने 6 चौकार मारले होते.

हेही वाचा-

विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला का आला? कर्णधारानं सांगितलं कारण
IND vs NZ: “धोनीकडून शिकावे….”, माजी क्रिकेटपटूचा कर्णधार रोहित शर्माला सल्ला….
WTC 2025 Points Table; पाकिस्तानची आगेकूच! इंग्लंडला धक्का? टीम इंडिया टाॅपवर..!

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---