श्रीलंका दौऱ्यावर असलेला भारतीय संघ 27 जुलैपासून आपल्या मोहिमेला सुरुवात करणार आहे. पहिला टी20 सामना पल्लेकेले येथे होणार आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ आपला दबदबा कायम ठेवण्याचा प्रयत्न करेल. या मालिकेतून भारतीय क्रिकेटमधील मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरच्या युगाची सुरुवात होणार आहे.
भारत आणि श्रीलंका यांच्यातील टी20 मधील हेड टू हेड आकडेवारी पाहिल्यास भारतीय संघाचा वरचढ आहे. भारत आणि श्रीलंका संघ आतापर्यंत 29 वेळा भिडले आहेत. या कालावधीत भारताने 19 सामने जिंकले आहेत तर श्रीलंकेच्या खात्यात 9 विजय आहेत. एक सामना अनिर्णित राहिला. भारताने श्रीलंकेत 8 सामने खेळले आहेत, त्यापैकी 5 सामने जिंकले आहेत तर यजमान श्रीलंकेने 3 सामन्यात विजय मिळवला आहे. दोन्ही संघांनी भारतात 17 टी20 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये टीम इंडियाने 13 तर श्रीलंकेने 3 सामने जिंकले तर एक सामना अनिर्णित राहिला.
भारत विरुद्ध श्रीलंका खेळपट्टीचा अहवाल
पल्लेकेलेच्या खेळपट्टीचा विचार केला तर, येथील खेळपट्टी फलंदाज आणि गोलंदाजांसाठी उपयुक्त ठरली आहे. या मैदानावर नवीन चेंडू गोलंदाजांना चांगली मदत करतो. मात्र, चेंडू जसजसा जुना होत जातो तसतसे येथे शॉट्स खेळणे सोपे होते. जसजसा सामना पुढे जातो तसतशी खेळपट्टी फलंदाजांच्या बाजूने बदलते.
विशेषत: संध्याकाळच्या सामन्यात दुसऱ्या डावात फलंदाजी करणे अधिक सोपे होते. त्यामुळेच या खेळपट्टीवर फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्हीमध्ये खेळाडूंना मदत मिळते. त्याचवेळी टॉसबद्दल बोलायचे झाले तर या मैदानावर नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजी करणे पसंत करतो.
श्रीलंकेविरुद्ध भारताची सर्वोच्च टी20 धावसंख्या
श्रीलंकेविरुद्धच्या टी20 मध्ये भारतीय संघाची सर्वोच्च धावसंख्या 5 विकेट्सवर 260 धावा आहे. टीम इंडियाने 22 डिसेंबर 2017 रोजी इंदूरमध्ये हा स्कोर केला होता. तर श्रीलंकेची भारताविरुद्धची सर्वोच्च धावसंख्या 215 धावांची आहे. लंकेने 9 डिसेंबर 2009 रोजी नागपूर, भारत येथे हा स्कोअर केला होता.
भारताचा टी20 संघ
सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुबमन गिल (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, रिंकू सिंग, रियान पराग, रिषभ पंत (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नो, अर्शदीप सिंग, खलील अहमद, मोहम्मद सिराज
हेही वाचा-
IND vs SL: कहरच म्हणा! श्रीलंकेविरुद्ध मोहम्मद सिराजची आकडेवारी पाहून, तुम्ही पण व्हाल थक्क!
पदकाचा दुष्काळ संपवण्यास खेळाडू सज्ज! पहिल्याच दिवशी या खेळातून खाते उघडण्याची अपेक्षा
IND vs SL: नव्या पर्वाला होणार सुरुवात; या कारणांमुळे टी20 मालिका ठरणार खास!