Brett Lee Praised Gautam Gambhir :- टी20 विश्वचषक 2024 (T20 World Cup 2024) नंतर भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा कार्यकाळ संपला. आता भारताच्या श्रीलंका दौऱ्यापासून भारतीय क्रिकेटमध्ये गंभीर पर्वाची सुरुवात होणार आहे. गौतम गंभीर याच्या (Gautam Gambhir) प्रशिक्षणाखाली भारतीय संघ 27 जुलै पासून श्रीलंकेत वनडे आणि टी20 मालिका खेळणार आहे. यादरम्यान ऑस्ट्रेलियाचा दिग्गज गोलंदाज ब्रेट ली (Brett Lee) याने गंभीरचे कौतुक केले आहे.
‘टाइम्स ऑफ इंडिया’शी बोलताना ब्रेट ली म्हणाला, “गंभीरला जेव्हा जेव्हा संधी मिळाली तेव्हा त्याने त्याची सर्वोत्तम कामगिरी केली आहे. आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार म्हणून गंभीरने दोनदा किताब जिंकला. गतवर्षी संघाला मार्गदर्शन करून ट्रॉफी जिंकली. संघाला एकत्र ठेवून यश मिळवणे हे त्याच्याकडून शिकायला हवे. तो एक उत्तम खेळाडू असून, त्याचा आक्रमकपणा सर्वांचे लक्ष वेधतो. म्हणूनच गंभीर भारताचा प्रशिक्षक झाल्याने संघाला खूप फायदा होईल यात शंका नाही. भारतीय संघ सुरक्षित हातात आहे.”
तसेच पुढे बोलताना ब्रेट लीने भारतीय संघाचा माजी प्रशिक्षक राहुल द्रविडचेही कौतुक केले. “मी राहुल द्रविडचे कौतुक करू इच्छितो कारण त्याने संघाला विश्वचषक जिंकून देण्यात मोठे योगदान दिले”, असे ब्रेट लीने सांगितले.
असे आहे भारताच्या श्रीलंका दौऱ्याचे वेळापत्रक-
टी20 मालिकेचे वेळापत्रक
पहिला टी20: 27 जुलै
दुसरा टी20: 28 जुलै
तिसरा टी20: 30 जुलै
वनडे मालिकेचे वेळापत्रक
पहिली वनडे: 2 ऑगस्ट
दुसरी वनडे : 4 ऑगस्ट
तिसरी वनडे : 7 ऑगस्ट
महत्वाच्या बातम्या-
आयपीएलमध्ये आक्रमक फटकेबाजी करणाऱ्या ‘या’ खेळाडूला कांगारुंनी दिलं संघात स्थान
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची बीसीसीआयला धमकी! “भारत चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी आला नाही तर…”