---Advertisement---

टीम बदलली, कर्णधार बदलला, पण नशिब नाही; भारताने गमावला सलग 18वा टॉस

On: शनिवार, ऑक्टोबर 25, 2025 12:02 PM
---Advertisement---

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा एकदिवसीय सामना सुरू आहे. ऑस्ट्रेलियन कर्णधार मिशेल मार्शने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघाने पुन्हा एकदा नाणेफेक गमावली आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारताने हा सलग 18वा टाॅस गमावला आहे. या दरम्यान कर्णधार आणि संघ बदलले, परंतु नाणेफेक गमावण्याचे नशीब बदललेले नाही. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिन्ही एकदिवसीय सामन्यांचे नेतृत्व शुबमन गिलने केले आणि तिन्ही सामन्यांमध्ये भारताने नाणेफेक गमावली आहे.

भारतीय क्रिकेट संघाने पहिला एकदिवसीय सामना 7 विकेट्सने आणि दुसरा 2 विकेट्सने गमावला आहे. दोन्ही सामन्यांमध्ये भारतीय संघाचे गोलंदाज आणि फलंदाज चांगली कामगिरी करू शकले नाहीत. संघाने आधीच मालिका गमावली आहे आणि आता तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात विजय मिळवल्याने भारत क्लीन स्वीप टाळण्याचा प्रयत्न करेल.

तिसऱ्या एकदिवसीय सामन्यासाठी भारतीय कर्णधार शुबमन गिलने कुलदीप यादव आणि प्रसिद्ध कृष्णाचा अंतिम अकरामध्ये समावेश केला आहे. नितीश रेड्डी आणि अर्शदीप सिंग यांना वगळण्यात आले आहे. हे दोन्ही खेळाडू पहिल्या दोन एकदिवसीय सामन्यांमध्ये प्रभाव पाडू शकले नाहीत. म्हणूनच त्यांना बाहेर काढण्यात आले.

दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करत 264 धावा केल्या. रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यर यांनी संघासाठी अर्धशतके केली. तथापि, या दोन्ही खेळाडूंना इतर फलंदाजांकडून साथ मिळाली नाही. ज्यामुळे दोन विकेटने पराभव झाला. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताला विजयाची संधी होती, परंतु ते ऑस्ट्रेलियाच्या शेवटच्या दोन विकेट घेण्यात अपयशी ठरले. मॅथ्यू शॉर्ट आणि कूपर कॉनोली यांच्या खेळीमुळे ऑस्ट्रेलियाने लक्ष्याचा पाठलाग केला.

तिसऱ्या एकदिवसीय सामन्यासाठी भारताचा अंतिम संघ:

रोहित शर्मा, शुबमन गिल (कर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, केएल राहुल (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, हर्षित राणा, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---