भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. कोरोनामुळे सर्वच काही ठप्प पडले होते. त्यात क्रिकेट काही वेगळे नाही. कोरोनाचा प्रादुर्भाव क्रिकेटवरही झाल्याचा पाहायले मिळाले. अनेक मोठमोठ्या स्पर्धा आणि द्विपक्षीय मालिका स्थगित करण्यात आल्या होत्या. आयपीएल २०२१ स्पर्धाही कोरोनामुळे अर्ध्यातून स्थगित करण्यात आली. असे असले तरीही भारतीय संघाचे पुढील आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे वेळापत्रक अतिशय व्यस्त आहे.
येत्या १८ जून ते २२ जून दरम्यान भारतीय संघ न्यूझीलंड संघाविरुद्ध विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळणार आहे. त्यानंतर त्यांना इंग्लंड संघाविरुद्ध ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. ईएसपीएन क्रिकइंफोने दिलेल्या माहितीनुसार, यानंतर भारतीय संघ नोव्हेंबर २०२२ मध्ये बांगलादेश दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यावर भारतीय संघाला २ कसोटी सामने आणि ३ वनडे सामने खेळेल. यापूर्वी देखील भारतीय संघाने २०१४ आणि २०१५ मध्ये बांगलादेशचा दौरा केला होता.
यावर्षी भारतीय संघाचा कार्यक्रम खूप व्यस्त आहे. कारण येणाऱ्या जून महिन्यात भारतीय संघ इंग्लंडला रवाना होणार आहे. तिथे त्यांना विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळायचा आहे. त्यानंतर ऑगस्ट महिन्यात इंग्लंड संघाविरुद्ध ५ कसोटी सामन्यांच्या थरार रंगणार आहे. त्यानंतर भारतीय संघाला दक्षिण आफ्रिका, टी-२० विश्वचषक स्पर्धा, न्यूझीलंड संघाविरुद्ध क्रिकेट खेळायचे आहे.
तसेच येणाऱ्या वर्षात वेस्ट इंडिज, श्रीलंका, इंग्लंड संघाविरुद्ध द्विपक्षीय मालिका झाल्यानंतर भारतीय संघाला आयपीएल, आशिया चषक, ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत देखील सहभाग घ्यायचा आहे.
असा आहे विश्व कसोटी अजिंक्यपद अंतिम सामन्यासाठी भारतीय संघ
रोहित शर्मा, शुबमन गिल, मयंक अगरवाल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे , हनुमा विहारी, रिषभ पंत, रविचंद्रन अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, ईशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकुर, उमेश यादव, केएल राहुल (फिट असेल तर), ऋधिमान साहा (फिट असेल तर).
राखीव खेळाडू : अभिमन्यु ईश्वरन, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान, अर्जन नगवासवाला
असा आहे विश्व कसोटी अजिंक्यपद अंतिम सामन्यासाठी न्यूझीलंड संघ
केन विलियमसन (कर्णधार), टॉम ब्लंडेल, ट्रेंट बोल्ट, डग ब्रेसवेल, डेवोन कॉन्वे, कॉलिन डी ग्रँडहोम, जैकब डफी, मॅट हेनरी, काइल जेमीसन, टॉम लाथम, डेरिल मिशेल, हेनरी निकोलस, एजाज पटेल, रचिन रविंद्र, मिशेल सेंटनेर, टिम साउथी, रॉस टेलर, नील वॅगनर, बीजे वाटलिंग (यष्टिरक्षक), विल यंग.
महत्त्वाच्या बातम्या-
‘या’ गोष्टीमुळे कसोटी अजिंक्यपद अंतिम सामन्यात रोहित येणार अडचणीत, माजी पाकिस्तानी कर्णधाराचा दावा
टीम इंडियासाठी अक्षरश: जीवाचं रान केलेल्या ‘या’ ३ खेळाडूंना कधीही मिळाली नाही कर्णधारपदाची संधी