टी20 विश्वचषक 2024 मधील 33वा सामना आज (शनिवार 15 जून) भारत विरुद्ध कॅनडा यांच्यात फ्लोरिडा येथे खेळला जाणार आहे. भारतीय संघ आधीच विश्वचषकाच्या सुपर-8 मध्ये पोहोचला आहे. त्यामुळे टीम इंडियासाठी हा सामना केवळ औपचारिकता आहे. अशा परिस्थितीत या सामन्यासाठी कर्णधार रोहित शर्मा संघातील काही खेळाडूंना विश्रांती देऊ शकतो. चला तर मग, या सामन्यासाठी भारतीय संघाच्या संभाव्य प्लेइंग इलेव्हनवर एक नजर टाकूया.
कॅनडाविरुद्धच्या सामन्यात भारताच्या फलंदाजी क्रमवारीत कोणताही बदल होण्याती शक्यता नाही. विराट कोहली रोहित शर्मासोबत डावाची सुरुवात करताना दिसेल. या स्पर्धेत आतापर्यंत कोहलीची बॅट शांत राहिली आहे. त्यामुळे कॅनडाविरुद्ध धावा करून सुपर-8 पूर्वी फॉर्ममध्ये येण्याचा त्याचा प्रयत्न असेल. त्यानंतर रिषभ पंत, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पांड्या आणि रवींद्र जडेजा हा फलंदाजी क्रम कायम राहण्याची शक्यता आहे.
भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये फक्त गोलंदाजीत बदल होऊ शकतात. जसप्रीत बुमराहसारख्या महत्त्वाच्या गोलंदाजाचा ताण कमी करण्यासाठी त्याला विश्रांती दिली जाऊ शकते. तसेच अक्षर पटेलच्या जागी कुलदीप यादवला संधी मिळू शकते. जसप्रीत बुमराह बाहेर गेल्यानंतर प्लेइंग 11 मध्ये हार्दिकसह केवळ तीन वेगवान गोलंदाज उरतील.
या सामन्यासाठी फिरकीपटू युजवेंद्र चहललाही संघात स्थान मिळू शकतं. अशाप्रकारे चाहत्यांना बऱ्याच काळानंतर ‘कुलचा’ (कुलदीप यादव-युजवेंद्र चहल) जोडी एकत्र खेळताना पाहायला मिळू शकते. भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये आणखी काही बदल होण्याची शक्यता फारच कमी आहे.
कॅनडा विरुद्ध भारताची संभाव्य प्लेइंग 11 – रोहित शर्मा, विराट कोहली, रिषभ पंत, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज
महत्त्वाच्या बातम्या –
‘कुदरत का निजाम’ पुन्हा एकदा अपयशी! पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम मोक्याच्या क्षणी नेहमीच होतो फ्लॉप
रोहित शर्मासोबत मतभेद?…म्हणून शुबमन गिलला टीम मॅनेजमेंटनं परत पाठवलं, मिळाली मोठ्या चुकीची शिक्षा
नेपाळचा हार्टब्रेक! दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अवघ्या एका धावेनं पराभव