शनिवारी म्हणजेच 2 सप्टेंबर रोजी आशिया चषक 2023 स्पर्धेतील भारत विरुद्ध पाकिस्तान संघाचा महामुकाबला खेळला जाणार आहे. हा सामना श्रीलंकेच्या कँडी येथे पार पडणार आहे. या सामन्यासाठी कर्णधार रोहित शर्मा याच्या नेतृत्वातील भारतीय संघाकडे अनेक मॅचविनर खेळाडू आहेत. मात्र, भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज केएल राहुल अनफिट असल्यामुळे तो पहिल्या दोन सामन्यांना मुकणार आहे.
संघ व्यवस्थापन पाकिस्तानविरुद्ध भारतीय संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणकोणत्या खेळाडूंना मैदानावर उतरवतो, हा खूपच आव्हानात्मक निर्णय असणार आहे. चाहते या सामन्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. अशात आपण या लेखातून भारतीय संघातील 3 समस्यांबाबत जाणून घेऊयात…
पाकिस्तानविरुद्ध भारताला करावा लागेल ‘या’ 3 समस्यांचा सामना
1. मधली फळी
भारतीय संघाची मधली फळी मागील काही काळापासून चिंतेचा विषय ठरत आहे. मात्र, आशिया चषक 2023 (Asia Cup 2023) स्पर्धेत शानदार फलंदाज श्रेयस अय्यर आणि केएल राहुल यांच्या पुनरागमनाने ही चिंता मिटली आहे. असे असले, तरीही भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात यष्टीरक्षक फलंदाज राहुल अनफिट असल्यामुळे तो खेळू शकणार नाहीये.
राहुलबाबत बीसीसीआयने सांगितले होते, की तो आशिया चषकातील भारताच्या सुरुवातीच्या दोन सामन्यात खेळू शकणार नाही. अशात चौथ्या क्रमांकावर श्रेयस अय्यरचे खेळणे जवळपास निश्चित आहे. केएल राहुलच्या जागी भारतीय संघ ईशान किशन याला प्लेइंग इलेव्हनमध्ये सामील करू शकतो. मात्र, संजू सॅमसन याला राखीव खेळाडू म्हणून ठेवले आहे.
यानंतर हार्दिक पंड्या सहाव्या स्थानावर आणि रवींद्र जडेजा सातव्या स्थानी फलंदाजी करताना दिसेल. पंड्या आणि जडेजाला संघासाठी फिनिशरची भूमिका पार पाडावी लागेल. अशात पाकिस्तानविरुद्ध राहुल नसणे ही भारतासाठी मधल्या फळीतील चिंता असल्याचे दिसत आहे.
2. फिरकीपटू
खरं तर, पाकिस्तानने पहिल्या सामन्यात शानदार सुरुवात करत नेपाळला पराभूत केले. सामन्यात बाबर आझम आणि इफ्तिखार अहमदने शतकी खेळी साकारली. अशात नेपाळला पराभूत करत पाकिस्तानचा आत्मविश्वास गगनाला भिडला आहे.
आशिया चषकासाठी फिरकीपटूंमध्ये कुलदीप यादवला मुख्य फिरकीपटू म्हणून संघात घेतले आहे. त्याच्याव्यतिरिक्त जडेजा आणि अक्षर पटेल हे खेळाडूदेखील आपल्या फिरकीच्या जाळ्यात फलंदाजांना अडकवू शकतात.
बाबर आझम, इफ्तिखार अहमद यांसारखे खेळाडू शानदार फॉर्ममध्ये आहेत. मात्र, आशियातील खेळपट्टीवर नेहमीच फिरकीपटूंचा दबदबा राहिला आहे. अशात, भारताने तिन्ही फिरकीपटूंना मैदानावर उतरवले, तर संघाला नक्कीच मजबुती मिळेल.
3. प्लेइंग इलेव्हनची निवड
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारतीय संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये केएल राहुल सामन्यातून बाहेर पडल्यामुळे संघ व्यवस्थापन या स्थानी कोणाला संधी देतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. असे म्हटले जात आहे, की राहुलच्या जागी किशनला यष्टीरक्षणाची जबाबदारी सोपवली जाऊ शकते.
भारतीय संघाकडून रोहित शर्मा आणि शुबमन गिल डावाची सुरुवात करतील. तिसऱ्या क्रमांकावर विराट कोहली याचे खेळणे निश्चित आहे. चौथ्या स्थानी श्रेयस अय्यर फलंदाजी करेल. तसेच, भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये दोन फिरकीपटू आणि 3 वेगवान गोलंदाजांचा समावेश असू शकतो.
वेगवान गोलंदाजी विभागात मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी हे खेळाडू दिसू शकतात. तसेच, फिरकी विभागाची जबाबदारी जडेजा आणि कुलदीपच्या खांद्यावर असू शकते. पाकिस्तानच्या मजबूत आव्हानापुढे भारतीय संघही मजबूत प्लेइंग इलेव्हनसोबत उतरावे लागेल. सर्व क्रिकेटप्रेमींना भारताच्या प्लेइंग इलेव्हनची प्रतीक्षा लागली आहे. (team india needs to finds solution of these problems ahead of ind vs pak asia cup 2023 know here)
हेही वाचाच-
आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा इतिहास बदलणार! पहिल्यांदाच तृतीयपंथी खेळाडूचे होणार पदार्पण, लगेच घ्या जाणून
काय सांगता! पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात ईशान ‘या’ क्रमांकावर करणार फलंदाजी?, वाचा सविस्तर