टीम इंडियाला (Team india) 16 वर्षांनंतर आयसीसी वनडे वर्ल्ड (Icc Odi World Cup 2027) कप जिंकायचा आहे. यासाठी बीसीसीआयने (BCCI) आतापासूनच तयारी सुरू केली असून, कर्णधार शुबमन गिल, मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि निवडकर्ते या स्पर्धेला समोर ठेऊन ठेवून निर्णय घेत आहेत. पण तरीही, संघात अजूनही 5 मोठ्या त्रुटी दिसत आहेत. स्पर्धा सुरू होण्यापूर्वी टीम इंडियाने या उणिवांवर काम केले नाही, तर मोठी संधी हातातून निघून जाऊ शकते.
सध्या दुखापतीमुळे हार्दिक पांड्या (Hardik pandya) खेळत नाही, ज्यामुळे संघाचे संतुलन बिघडले आहे. संघाकडे हार्दिक पांड्याचा कोणताही बॅकअप नाही. जर पांड्या दुखापतीमुळे खेळू शकला नाही, तर परिस्थिती बिकट होईल. अशा वेळी टीम इंडियाला आताच पांड्याचा पर्याय शोधणे गरजेचे आहे.
त्याचबरोबर, अलीकडच्या काळात टीम इंडियाचे अनेक खेळाडू दुखापतीच्या समस्येशी संघर्ष करत आहेत. कर्णधार शुबमन गिल, हार्दिक पांड्या, हर्षित राणा आणि जसप्रीत बुमराह यांसारखे मॅचविनर खेळाडू वारंवार दुखापती होत आहेत. त्यामुळे टीम इंडियाला लवकरच या समस्येतून बाहेर पडावे लागेल.
इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेदरम्यान टीम इंडियाची पडती बाजू समोर आली. प्रसिद्ध कृष्णा, अर्शदीप सिंग, गुरनूर ब्रार आणि प्रिन्स यादव यांना संधी मिळत आहे, पण ते या संधीचा फायदा योग्य प्रकारे घेऊ शकत नाहीत. जसप्रीत बुमराहला योग्य जोडीदार मिळवून देण्याचा प्रश्न टीम इंडियाला लवकरच सोडवावा लागेल.
रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) सध्या संघाच्या योजनेचा भाग नाही. दुसरीकडे, अक्षर पटेल आणि वाशिंगटन सुंदर यांची सातत्याने चांगली कामगिरी नाही. त्यामुळे, दक्षिण आफ्रिकेत टीम इंडियाला कुलदीप यादवसोबत (Kuldeep Yadav) एका स्पिन ऑलराउंडरचीही गरज आहे, ज्यावर टीम इंडियाला काम करावे लागेल.
तसेच, सध्या वनडे फॉरमॅटमध्ये केएल राहुल, हार्दिक पांड्या आणि अक्षर पटेल हे मॅच फिनिशर म्हणून दिसत आहेत. हार्दिकशिवाय बाकीचे दोन्ही फलंदाज पहिल्याच चेंडूपासून आक्रमक फटकेबाजी करण्यात पटाईत नाहीत. अशा वेळी, शेवटच्या षटकांमध्ये धावांचा पाऊस पाडणाऱ्या आक्रमक फलंदाजाचा शोध संघाने घेणे गरजेचे आहे. आता वर्ल्ड कप पूर्वी कर्णधार शुबमन गिल आणि गौतम गंभीर यांच्यापुढे मोठं आव्हान असणार आहे.






