आशिया चषक 2023 स्पर्धेसाठी 17 सदस्यीय भारतीय संघ जाहीर करण्यात आला आहे. या संघांमध्ये मोठ्या कालावधीनंतर श्रेयस अय्यर व केएल राहुल पुनरागमन करत आहेत. आशिया चषकानंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे मालिका आणि त्यानंतर थेट विश्वचषक खेळेल. त्यामुळे विश्वचषकात सहभागी होण्याआधी भारताकडे जास्तीत जास्त नऊ आंतरराष्ट्रीय सामने व दोन सराव सामने असतील. या सर्वांमध्ये भारताचा क्रमांक चारचा फलंदाज कोण असणार? हा प्रश्न अजूनही अनुत्तरीत आहे. मात्र, आकडेवारी पाहिल्यानंतर या जागेवर श्रेयस अय्यर याचा हक्क असल्याचे दिसून येते.
मागील विश्वचषकापासून भारतीय संघाच्या क्रमांक चारच्या फलंदाजाची जागा कोणीही भरून काढू शकलेला नाही. या क्रमांकावर जवळपास दहा फलंदाज खेळले असून, केवळ श्रेयस अय्यर हाच या जागेला न्याय देऊ शकला असे दिसून येते. अय्यरने भारतीय संघासाठी 20 वनडेत चौथ्या क्रमांकावर फलंदाजी केली. यामध्ये त्याने 805 धावा केल्या असून यादरम्यान त्याचे सरासरी 47.35 व स्ट्राईक रेट 95 पेक्षा जास्त राहिला आहे. या क्रमांकावर त्याच्या बॅटमधून दोन शतके व पाच अर्धशतके देखील आली आहेत. त्यामुळे श्रेयस याला या क्रमांकावर संधी मिळण्याची दाट शक्यता आहे.
सध्या आशिया चषक स्पर्धेसाठी निवडलेल्या भारतीय संघात असे अनेक फलंदाज आहेत जे चौथ्या आणि पाच पक क्रमांकावर खेळण्याचे दावेदार मानले जातात. दुखापतीतून पुनरागमन करत असलेले अय्यर व राहुल हे या क्रमांकाचे पहिले दावेदार आहेत. तर शानदार फॉर्ममध्ये असलेला ईशान किशन व सूर्यकुमार यादव पाचव्या क्रमांकासाठी भिडताना दिसण्याची शक्यता आहे. तर युवा तिलक वर्मा चौथ्या क्रमांकाच्या जागेसाठी श्रेयसला टक्कर देऊ शकतो.
(Team India Number 4 Is Likely Shreys Iyer See Stats)
हेही वाचा-
ना विराट, ना गिल! World Cup 2023मध्ये ‘हा’ भारतीय धुरंधर ठोकणार सर्वाधिक धावा, सेहवागची भविष्यवाणी
कशी नशिबाने थट्टा आज मांडली! भारताच्या ‘या’ खेळाडूचे करिअर बर्बाद? 2 वर्षांपासून खेळला नाही सामना