भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील डब्ल्यूटीसी अंतिम सामना लंडनच्या के ओव्हल मैदानावर खेळला जात आहे. या सामन्यात नाणेफेक गमावत ऑस्ट्रेलिया संघाने पहिल्या डावात 469 धावांचा डोंगर उभारला. या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाने पहिल्या डावात 296 धावा चोपल्या. मात्र, ऑस्ट्रेलिया संघाने तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 4 विकेट्स गमावत 123 धावांवर खेळत आहे. अशाप्रकारे त्यांच्याकडे 296 धावांचीच आघाडी आहे. दुसरीकडे, सोशल मीडियावर एक फोटो जोरदार व्हायरल होत आहे. हा फोटो डब्ल्यूटीसी अंतिम सामन्याच्या तिसऱ्या दिवसातील आहे.
सोशल मीडियावर फोटो व्हायरल
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या फोटोत एक चाहती भारतीय सलामीवीर फलंदाज शुबमन गिल (Shubman Gill) याला लग्नाची मागणी घालताना दिसत आहे. या चाहतीच्या हातात एक पोस्टर आहे आणि त्या पोस्टरवर “मॅरी मी शुबमन गिल,” म्हणजेच “शुबमन गिल माझ्याशी लग्न कर,” असे लिहिले आहे. आता हा फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. याव्यतिरिक्त सोशल मीडियावर युजर्स सातत्याने कमेंट्सचा पाऊस पाडत आहेत.
Proposal for Shubman Gill at the Oval. pic.twitter.com/76hpNoPlbi
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) June 9, 2023
एका महिला युजरने लिहिले की, “ही मुलगी क्यूट आहे आता साराचं काय होणार?”
Cute h ladki ab sara ka kya hoga
— Teena???? (@oye_jaatni) June 9, 2023
शुबमन गिलची पहिल्या डावातील कामगिरी
दुसरीकडे, शुबमनच्या सामन्यातील कामगिरीविषयी बोलायचं झालं, तर त्याने पहिल्या डावात चाहत्यांना निराश केले. गिल पहिल्या डावात 15 चेंडूंत 13 धावा करून बाद झाला. गिलला स्कॉट बोलँडने त्रिफळाचीत केले. मात्र, गिलकडून दुसऱ्या डावात चांगल्या प्रदर्शनाची अपेक्षा असेल. विशेष म्हणजे, आयपीएल 2023 हंगामात शुबमन गिल याने सर्वाधिक 890 धावा केल्या आहेत.
आतापर्यंतची सामन्याची स्थिती
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australia) संघातील डब्ल्यूटीसी अंतिम सामन्याविषयी बोलायचं झालं, तर ऑस्ट्रेलियाने नाणेफेक गमावत प्रथम फलंदाजी करताना 469 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावातील 469 धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या भारतीय फलंदाजांनी निराश केले. भारताचे फक्त 2 फलंदाज 50 धावांचा आकडा पार करू शकले. अजिंक्य रहाणे आणि शार्दुल ठाकूर या दोन फलंदाजांनी अर्धशतक झळकावली. तसेच, रवींद्र जडेजा 48 धावांवर तंबूत परतला. यावेळी ऑस्ट्रेलियाकडून कर्णधार पॅट कमिन्स याने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तसेच, मिचेल स्टार्क, स्कॉट बोलँड आणि कॅमरून ग्रीन यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेत्लया. तसेच, नेथन लायन यानेही 1 विकेट घेतली.
यानंतर ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 4 विकेट्स गमावत 123 धावा केल्या आहेत. मार्नस लॅब्यूशेन (41) आणि कॅमरून ग्रीन (7) हे खेळाडू खेळपट्टीवर टिकून आहेत. (team india opening batsman shubman gill proposal ind vs aus wtc final)
महत्वाच्या बातम्या-
गुड न्यूज! आशिया चषक अन् वनडे विश्वचषकापूर्वी हॉटस्टारची मोठी घोषणा, वाचून क्रिकेटप्रेमीही होतील खुश
मिचेल स्टार्कचा जबरदस्त विक्रम! 600 विकेट्स घेताच नावावर झाला मोठा रेकॉर्ड