भारतीय संघात मागच्या काही दिवसांमध्ये खूप बदल पाहायला मिळाले. संघाचा कर्णधार आणि सपोर्ट स्टाफ बदलला गेला आहे. कसोटी संघातील खेळाडूंमध्येही खूप बदल पाहायला मिळत आहे. अनुभवी खेळाडूंऐवजी युवा खेळाडूंना अधिक संधी मिळत आहे. आता संघाच्या बॅकरूम स्टाफमध्ये अजून एक मोठा बदल होणार आहे. बीसीसीआयने भारतीय संघाचे मुख्य फिजिओ नितिन पटेल यांना आता राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये (NCA) पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.
नितिन पटेल (Nitin Patel) मागच्या काही वर्षांपासून भारतीय संघाच्या मुख्य फिजिओची जबाबदारी चांगल्या पद्धतीने पार पाडत आले होते. आता एनसीमध्ये खेळाडूंच्या दुखापतीच्या वाढत्या प्रकरणांमुळे त्यांची गरज त्याठिकाणी अधिक असल्याचे दिसते.
एका क्रिकेट संकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार, नितिन पटेल यांना एनसीएच्या स्पोर्ट्स सायंस आणि मेडिसिन डिपार्टमेंटचे नवीन प्रमुख म्हणून त्याठिकाणी पाठवले जात आहे. पटेल यांच्यासाठी हे एक प्रमोशन मानले जात आहे. मागच्या वर्षी मुख्य प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफसह या पदासाठीही जाहिरात काढली गेली होती. परंतु आता नितिन पटेल यांनाच या पदावर नियुक्त केले गेले आहे. भारत आणि श्रीलंका कसोटी मालिका संपल्यानंतर ते हा नवीन पदभार स्वीकारतील.
बीसीसीआयने अलिकडच्या काही दिवसांपूर्वी पुरुष आणि महिला संघाच्या फिजिओथेरपिस्टच्या नियुक्तीसाठी अर्ज मागवले होते. भारतीय संघाकडे सध्या दोन फिजिओ आहेत. एक म्हणजे नितिन पटेल आणि दुसरे योगेश परमार, जे पटेल यांचे जूनियर आहेत. असे असले तरी, बोर्डची इच्छा आहे की, संघासोबत दोन फिजिओ नेहमी उपलब्ध असावेत. याचे मुख्य कारण म्हणजे कोरोना माहामारी. मागच्या वर्षी इंग्लंड दौऱ्यावर स्वतः पटेल कोरोना संक्रमित आढळले होते आणि त्यानंतर संघाला त्यांचा शेवटचा कसोटी सामना रद्द करावा लागला होता.
माहिती अशीही आहे की, संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड जे यापूर्वी एनसीएचे प्रमुख होते, त्याच्या सांगण्यावरूनही पटेल यांची एनसीमध्ये नियुक्त केली गेली असू शकते. सध्या भारतीय संघाच्या खेळाडूंना होणाऱ्या दुखापतींचे प्रमाण खूप वाढले आहे आणि त्यानंतर त्यांना एनसीएमध्ये देखभाल आणि रिहॅबिलिटेशनचा कालावधी पूर्ण करावा लागतो. अशात नितिन पटेल यांसारख्या अनुभवी व्यक्तीची एनसीएमध्ये अधिक गरज असल्याचे दिसते.
महत्वाच्या बातम्या –
दुसऱ्या कसोटीपूर्वी वॉर्नरने दिली महत्वाची प्रतिक्रिया; खेळपट्टीबाबत म्हणाला…
Video : पाकिस्तानात चालता चालता स्विमिंग पूलमध्ये कोसळला ऑस्ट्रेलियन खेळाडू
मुंबई इंडियन्ससाठी खूशखबर! आर्चरचे मैदानात पुनरागमन; पाहा व्हिडिओ