भारतीय संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. इंग्लंडविरुद्धचा एकमात्र कसोटी सामना १ जुलैपासून बर्मिंघमच्या एजबस्टन स्टेडियमवर खेळला जाणार आहे. तत्पूर्वी भारतीय संघ या सामन्यासाठी कसून सराव करत आहे. कोरोनाची लागण झाल्यामुळे रोहित शर्मा या सामन्यात उपस्थित असण्याची शक्यता नाहीये, पण विराट कोहली आणि संघातील इतर खेळाडू सराव सत्रात खूपच उत्साहात दिसले.
कर्णधारपदाच्या दबावामुळे विराट कोहली मागच्या दोन वर्षांमध्ये अपेक्षित प्रदर्शन करू शकला नव्हता. याच कारणास्तव त्याने भारताचे कर्णधारपद सोडले, पण अद्याप त्याला स्वतःचा जुना फॉर्म गवसला नाहीये. असे असले तरी, इंग्लंडविरुद्धच्या आगामी कसोटी सामन्यात विराट पुन्हा एकदा त्याच्या जुन्या अंदाजात दिसण्याची शक्यता आहे. सराव सत्रात विराटकडून तसे संकेतही मिळाले आहेत.
कसोटी सामन्यापूर्वी सराव सत्रात विराट कोहली (Virat Kohli) चांगल्या फॉर्ममध्ये तर होताच, पण त्याची देहबोलीही काही वर्षांपूर्वी जशी असायची अगदी तशीच दिसत होती. सराव सत्रात विराट चेतेश्वर पुजाराच्या आधी फलंदाजीसाठी आला. विराट जेव्हा फलंदाजीचा सराव करत होता, तेव्हा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) मैदानात आला. नेट्सजव येऊन द्रविड बसला आणि विराटला फक्त एक मिनिट फलंदाजी करताना पाहिल्यानंतर त्याने एक इशारा केला. त्याचा इशारा पाहिल्यानंतर असे वाटले की, तो विराटला म्हणत असावा की, ठीक आहे, ज्यावर आपण चर्चा केली आहे, तू त्याच पद्धतीने फलंदाजी करत आहे.
तसे पाहिले तर, द्रविड नेहमी शांत असतो, पण विराटच्या एका वक्तव्यामुळे त्याला मैदानात हसताना पाहिले गेले. रविंद्र जडेजा विराटला गोलंदाजी करत होता. यादरम्यान जडेजाने विराटच्या विकेटसाठी गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हांम्ब्रेंकडे जोरदार अपील केली. यावर विराट म्हणाल की, अरे भाऊ तुझा चष्मा काढून बघ, कसा बाद आहे ? विराटच्या या वक्तव्यानंतर द्रविडला स्वतःचे हसू रोखता आले नाही.
सराव सत्रात विराटने अंदाजे ४० मिनिट फलंदाजी केली. यादरम्यान वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज आणि त्याच्यामध्येही गमतीशीर चर्चा झाल्याचे समजते. सिराजने टाकलेला एक चेंडू विराट खेळू शकला नाही. यावर विराट म्हणाला की, अरे भाऊ तू मला गोलंदाजी करतोय की, कोणी फलंदाज नाही समजून गोलंदाजीचा सराव करत आहे. यावर सिराज त्याला सॉरी म्हणून पुढचा चेंडू टाकण्यासाठी गेला.
विराट कोहली मागच्या दोन वर्षांपेक्षा जास्त काळापासून त्याच्या प्रतिभेनुसार खेळू शकला नाहीये. त्याने २०१९ मध्ये बांगलादेशविरुद्धच्या डे नाईट कसोटी शेवटचे शतक केले होते. त्यानंतर अद्याप त्याला शतक करता आले नाहीये. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात विराटकडून चाहत्यांना शतकांची अपेक्षा आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
भारताने दिलेली जखम आफ्रिकेच्या जिव्हारी, इंग्लंड दौऱ्यापूर्वी लागला मोठा झटका
प्रेक्षकांना लवकरच दिसणार राहुलचा कमाल,लाजवाब अंदाज; वाचा पोस्ट करत काय म्हणाला
तब्बल ३६ वर्षानंतर एजबस्टन कसोटीमध्ये बुमराहमुळे घडू शकतो ‘तो’ योगायोग






