भारत विरुद्ध श्रीलंका (IND vs SL) संघातील दुसरा कसोटी सामना (Second Test) १२ ते १६ मार्चदरम्यान बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर होणार आहे. हा सामना दिवस-रात्र (Day Night Test) स्वरुपात खेळवला जाणार आहे. भारतीय संघाने यापूर्वीचा मोहाली येथे झालेला पहिला कसोटी सामना एक डाव आणि २२२ धावांनी जिंकला असून मालिकेत १-० अशी आघाडीही घेतली आहे. त्यामुळे आता टी२० मालिकेनंतर कसोटी मालिकेतही श्रीलंकेला क्लिन स्वीप करण्यावर भारतीय संघाची नजर असेल. तत्पूर्वी भारताचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्यापुढील सर्वात मोठे आव्हान प्लेइंग इलेव्हन (Team India Probable Playing Xi) निवडणे हे असेल.
या सामन्यात कर्णधार रोहितसोबत मयंक अगरवाल सलामीला फलंदाजीसाठी येऊ शकतो. तर हनुमा विहारी याला तिसऱ्या क्रमांकावर पाठवले जाऊ शकते, ज्याने मोहाली कसोटीतील त्याच्या फलंदाजीने सर्वांना मंत्रमुग्ध केले होते. तर विराट कोहली आणि श्रेयस अय्यर अनुक्रमे चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर उतरू शकतात. तर यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत सहाव्या क्रमांकावर येऊ शकतो.
मात्र गोलंदाजी फळीची निवड करताना कर्णधार रोहितची डोकेदुखी वाढू शकते. कारण प्लेइंग इलेव्हनमधील सर्वात कमजोर बाजू, फिरकीपटू जयंत यादव आहे. त्याचे मोहाली कसोटीतील प्रदर्शन अतिशय सुमार राहिले होते. त्याने या सामन्यातील दोन्ही डावात मिळून १७ षटके फेकली होती. मात्र यादरम्यान त्याला एकही विकेट घेता आली नव्हती. अशात त्याच्याजागी मोहम्मद सिराज किंवा अक्षर पटेल यांच्यापैकी एकाला संधी दिली जाऊ शकते. त्यातही सिराजला चेन्नईच्या मैदानाचा अनुभव जास्त असल्यामुळे त्याचा प्लेइंग इलेव्हनमधील दावा मजबूत आहे.
तसेच मोहाली कसोटीत शानदार प्रदर्शन करणाऱ्या फिरकी अष्टपैली रविंद्र जडेजा आणि आर अश्विनला या सामन्यात खेळवले जाऊ शकते. अशाप्रकारे दिवस-रात्र कसोटी सामन्यात भारताकडून २ फिरकी गोलंदाज आणि ३ वेगवान गोलंदाज मैदानावर उतरू शकतात.
रोहित शर्मा (कर्णधार), मयंक अगरवाल, हनुमा विहारी, विराट कोहली, श्रेयस अय्यर, रिषभ पंत (यष्टीरक्षक), रविंद्र जडेजा, आर अश्विन, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज/अक्षर पटेल
महत्वाच्या बातम्या-
ऑस्ट्रेलियन खेळाडूचा फायनलमध्ये ‘कॅच विन्स द मॅच’चा प्रत्यय, संघाला १८ धावांनी जिंकून दिला मार्श कप
विश्वचषक विजेत्या प्लेइंग इलेव्हनमधील ‘हा’ एकटा खेळाडू दिसतोय आता मैदानावर; इतरांनी टांगले बूट
“आता रोहितने ‘तो’ फटका खेळणे बंद करावे” भारतीय दिग्गजाचा हिटमॅनला सल्ला