येत्या दोन दिवसात भारतीय संघाला टी20 विश्वचषक 2022 स्पर्धेतील आपला पहिला सामना खेळणार आहे. हा सामना 23 ऑक्टोबर रोजी होबार्ट येथे पाकिस्तानविरुद्ध खेळला जाणार आहे. या सामन्यापूर्वी भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेल मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्या देखरेखीखाली नेटमध्ये गोलंदाजी करताना दिसला. मात्र, संघात तीन डावखुरे फलंदाज असल्यामुळे प्लेइंग इलेव्हनमध्ये त्यांची निवड करणे कठीण होईल. भारतीय संघाने मागील एका वर्षात प्लेइंग इलेव्हनमध्ये अनेक बदल केले आहेत. यामध्ये काही बदल संघ व्यवस्थापनामुळे झाले, तर काही खेळाडूंच्या दुखापतींमुळे. अशात संघाचे संतुलन बिघडत राहिले. संघात अधिकतर खेळाडूंनी शुक्रवारी (दि. 21 ऑक्टोबर) सराव करण्यापेक्षा विश्रांती करण्याला प्राधान्य दिले.
प्लेइंग इलेव्हनमध्ये कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma), केएल राहुल (KL Rahul), विराट कोहली (Virat Kohli), सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav), हार्दिक पंड्या (Hardik Pandya) यांची जागा निश्चित आहे. दुसरीकडे, सध्याच्या परिस्थितीत यष्टीरक्षक फलंदाज म्हणून दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) हा रिषभ पंत (Rishabh Pant) याच्यापेक्षा पुढे आहे. कार्तिकने शुक्रवारी फलंदाजी सरावानंतर बराच वेळ यष्टीरक्षणाचाही सराव केला. पंत भारतीय फलंदाजी फळीतील अव्वल सहामध्ये एकमेव डावखुरा फलंदाज आहे, अशात जर कार्तिक आणि पंत दोघेही संघात सामील झाले, तर रोहितला पंड्याला पाचवा गोलंदाजी पर्याय म्हणून वापरावे लागेल, जे अनेकदा संघासाठी चिंतेचा विषय ठरला आहे.
रिषभ पंतसारखीच काहीशी स्थिती फिरकी गोलंदाजांमध्ये अक्षर पटेल (Akshar Patel) याचीही आहे. तो मागील काही काळापासून संघासाठी चांगली गोलंदाजी करत आहे. पाकिस्तानच्या वरच्या फळीत फखर झमान, मोहम्मद नवाज आणि खुशदिल शाह यांसारख्या डावखुऱ्या फलंदाजांच्या उपस्थितीत डावखुऱ्या फिरकीपटूने खेळणे महागात पडू शकते.
या गोलंदाजी विभागात आर अश्विन (R Ashwin) याचा अनुभवदेखील दुर्लक्षित केला जाऊ शकत नाही. कारण, त्याची उपस्थिती संघात विविधता घेऊन येते. ऑस्ट्रेलियाच्या भल्यामोठ्या मैदानावर युझवेंद्र चहल हा संघाचा पहिल्या पसंतीचा फिरकीपटू असेल. तसेच, वेगवान गोलंदाजीमध्ये मोहम्मद शमीसोबत भुवनेश्वर कुमार आणि अर्शदीप सिंग याची संघात असलेली जागा जवळपास पक्की असल्याचे दिसत आहे. सध्याचा फॉर्म पाहता हर्षल पटेलला संघात स्थान मिळवणे कदाचित कठीण जाईल.
अशी असू शकते प्लेइंग इलेव्हन
रोहित शर्मा, केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक, आर अश्विन, युझवेंद्र चहल, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ब्रेकिंग: महिला क्रिकेट संघाच्या बसचा अपघात; चार खेळाडू आणि मॅनेजर गंभीर जखमी
ताहिरचे पाकिस्तानसाठी कोणते स्वप्न राहिले अपूर्ण? 43 वर्षांच्या वयात सांगितल्या मनातील भावना