ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीतील खराब कामगिरीनंतर भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीनंतर रोहित शर्मा आणि विराट कोहली कसोटीतून निवृत्त होतील, अशी अटकळ बांधली जात आहे. पण या दोन्ही दिग्गजांनी खरोखरच निवृत्तीचा निर्णय घेतला आहे का? ऑस्ट्रेलियाविरुद्धची बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी ही रोहित शर्मा आणि विराट कोहलीची शेवटची कसोटी मालिका असेल का? भारताचे माजी क्रिकेटपटू रवी शास्त्री यांनी याबाबत मोठी भविष्यवाणी केली आहे.
रवी शास्त्रींचा असा विश्वास आहे की विराट कोहलीत अजून तीन ते चार वर्षांचे क्रिकेट शिल्लक आहे. परंतु रोहित शर्मा दीर्घकाळ कसोटी फॉर्मेटमध्ये फॉर्म आणि तंत्राशी झुंजत आहे. त्यामुळे भारतीय कर्णधाराने भविष्याचे आकलन करणे गरजेचे आहे. तो म्हणाला की विराट काही काळ खेळेल असे मला वाटते. तो बाहेर पडण्याचा मार्ग किंवा इतर गोष्टी विसरून जावा. मला वाटते की तो पुढील तीन-चार वर्षे खेळेल. जोपर्यंत रोहितचा संबंध आहे. त्याला निर्णय घ्यावा लागेल. त्याचे फुटवर्क पूर्वीसारखे नाही.
रोहित शर्माच्या खराब फॉर्मवर रवी शास्त्री म्हणाले की, तो कधीकधी शॉट्स खेळण्यास उशीर करतो. त्यामुळे मालिकेच्या शेवटी त्याने निर्णय घ्यावा. याशिवाय, माजी भारतीय मुख्य प्रशिक्षकाने रोहित शर्माच्या फलंदाजीतील तांत्रिक समस्या, विशेषतः त्याच्या पुढच्या पायाच्या हालचालींकडे लक्ष वेधले. तो म्हणाला की, त्याचा पुढचा पाय चेंडूकडे पाहिजे तसा जात नसल्याचे आपण मालिकेत अनेकदा पाहिले आहे. मात्र, विराट कोहली आणि रोहित शर्मा कसोटी फॉरमॅटमधील त्यांच्या भवितव्याबाबत काय निर्णय घेतात हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.
हेही वाचा-
कर्णधार रोहित शर्माच्या नावावर नकोशा रेकाॅर्डची नोंद, सचिनलाही टाकले मागे
रोहित शर्मा, विराट कोहलीच्या भविष्याबद्दल माजी दिग्गजाचे मोठे वक्तव्य! म्हणाला…
कोणाला मिळणार ‘आयसीसी क्रिकेटर ऑफ द इयर’ पुरस्कार? या 4 खेळाडूंची नावे शाॅर्टलिस्ट