टी20 विश्वचषक 2024 ची ट्रॉफी जिंकल्यानंतर टीम इंडिया झिम्बाब्वे विरुद्ध 5 सामन्यांची टी20 मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी टीम इंडिया झिम्बाब्वेला पोहोचली आहे. प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या भारतीय संघाचे झिम्बाब्वे क्रिकेटने खास स्वागत केले. राहुल द्रविडचा मुख्य प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपल्याने आणि नवीन मुख्य प्रशिक्षकाची नियुक्ती न झाल्याने संघ व्हीव्हीएस लक्ष्मण यांच्या प्रशिक्षणाखाली ही मालिका खेळण्यासाठी गेला आहे.
ही मालिका खेळण्यासाठी टीम इंडिया 3 जुलै रोजी रॉबर्ट गॅब्रिएल मुगाबे आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचली, जे झिम्बाब्वेचे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. यानंतर झिम्बाब्वे क्रिकेटने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये सर्व भारतीय खेळाडू विमानतळाच्या बाहेर येताना दिसले. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये झिम्बाब्वे क्रिकेटने लिहिले – “आम्ही टी20 वर्ल्ड कप चॅम्पियन भारताचे स्वागत करतो.” यासाठी झिम्बाब्वे क्रिकेटचे खूप कौतुक होत आहे.
𝐖𝐞 𝐰𝐞𝐥𝐜𝐨𝐦𝐞 𝐓𝟐𝟎 𝐖𝐨𝐫𝐥𝐝 𝐂𝐮𝐩 𝐂𝐡𝐚𝐦𝐩𝐢𝐨𝐧𝐬 𝐈𝐧𝐝𝐢𝐚 🇮🇳 ! 🤗#ZIMvIND pic.twitter.com/Oiv5ZxgzaS
— Zimbabwe Cricket (@ZimCricketv) July 2, 2024
भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील पाच सामन्यांच्या टी20 मालिकेतील पहिला सामना 6 जुलै रोजी होणार आहे. दुसरा सामना 7 जुलैला, तिसरा सामना 10 जुलैला, चौथा सामना 13 जुलैला आणि या मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना 14 जुलैला खेळवला जाईल. सर्व सामने भारतीय वेळेनुसार दुपारी 4.30 वाजता सुरू होतील. सर्व सामने हरारे स्पोर्ट्स क्लब येथे होणार आहेत.
झिम्बाब्वे दाैऱ्यासाठी भारताचा संघ
शुबमन गिल (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, अभिषेक शर्मा, रिंकू सिंग, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रियान पराग, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, आवेश खान, खलील अहमद, मुकेश कुमार, तुषार देशपांडे, साई सुदर्शन, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), हर्षित राणा
महत्तवाच्या बातम्या-
द्रविडची निवृत्ती, गंभीरबाबत अपडेट नाही; मग झिम्बाब्वे दौऱ्यावर टीम इंडियाचे प्रशिक्षक कोण?
विद्या व्हॅली, विबग्योर इंटरनॅशनल स्कूलची बाजी – 17 वर्षांखालील गटात एसएनबीपी स्कूलचे वर्चस्व
मायकेल वॉन अन् अँड्र्यू फ्लिंटॉफची मुलं एकत्र करतील पदार्पण? इंग्लंडच्या अंडर-19 कसोटी संघात झाली एंट्री