दक्षिण आफ्रिका संघाने भारतात येऊन टी-२० मालिकेत आघाडी घेतली आहे. दक्षिण आफ्रिका संघाने मालिकेतील पहिल्या दोन्ही सामन्यांमध्ये चांगले प्रदर्शन केले आणि विजय मिळवला. उभय संघातील तिसरा सामना १४ जून रोजी विशाखापटनममध्ये खेळला जाणार आहे. या सामन्यात जर संघ पराभूत झाला, तर मालिका देखील गमावून बसेल. अशात या महत्वाच्या सामन्यापूर्वी संघाला काही महत्वाचे बदल करणे आवश्यक आहे.
ऋतुराज गायकवाडला अजून एक संधी मिळणार ?
टी-२० मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय गोलंदाज कमी पडल्यामुळे संघ पराभूत झाला, पण दुसऱ्या सामन्यात फलंदाज देखील अपयशी ठरल्याचे पाहिले गेले. भारताची सलामीवीर जोडी पहिल्या दोन्ही सामन्यांमध्ये मोठी भागीदारी करू शकली नाहीये. इशान किशनने पहिल्या सामन्यात ७६ आणि दुसऱ्या सामन्यात ३४ धावा केल्या. परंतु दुसरा सलामीवीर ऋतुराज गायकवाड मात्र अद्याप चांगले प्रदर्शन करू शकला नाहीये. त्याने पहिल्या सामन्यात २३, तर दुसऱ्या सामन्यात अवघी १ धाव करून विकेट गमावली. अशात तिसऱ्या सामन्यात त्याला संधी मिळते की नाही यावबाबत शंका आहे.
कर्णधार रिषभ पंत स्वतः नाहीये फॉर्ममध्ये
रोहित शर्माच्या अनुपस्थितीत केएल राहुल या मालिकेत भारतीय संघाचे नेतृत्व करणार होता. पण मालिका सुरू होण्याच्या काही दिवस आधी त्याला दुखापत झाली आणि रिषभ पंतकडे कर्धणारपदाची धुरा सोपवली गेली. पंतने या मालिकेतील पहिल्या सामन्यात २९ तर दुसऱ्या सामन्यात अवघ्या ५ धावा केल्या आहेत. त्याने आतापर्यंत खेळल्या एकूण ४५ टी-२० सामन्यांमध्ये २४.९ च्या सरासरीने आणि १२६.६ च्या स्ट्राईक रेटने केवळ तीन अर्धशतके केली आहे. हे प्रदर्शन पंतच्या प्रतिभेला साजेशे नाही. कर्णधाराच्या रूपात पंतने घेतलेले अनेक निर्णय देखील चुकीचे ठरले आहेत.
फिरकी गोलंदाजांच्या जोडीने केली निराशा
फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहल आणि अक्षर पटेल या जोडीने पहिल्या दोन्ही सामन्यात निराशा केली. डेविड मिलर, रस्सी व्हॅन डर दुसेन आणि हेन्रिच क्लासेन या फलंदाजांनी फिरकीविरोधात सहज धावा केल्याच्या पाहायला मिळाले आहे. तिसऱ्या सामन्यात यांच्यातील कोणत्यातरी एका खेळाडूला बाहेर केले जाऊ शकते. संघ युवा फिरकी गोलंदाज रवी बिश्नोई किंवा वेंकटेश अय्यर यांच्यातील एकाला संधी देऊ शकतो.
उमरान किंवा अर्शदीपला मिळू शकते संधी
भारताचा भुवनेश्वर कुमार सोडला, तर एकही वेगवान गोलेंदाज मालिकेत चांगले प्रदर्शन करू शकला नाहीये. पहिल्या दोन्ही सामन्यात वेगवान गोलंदाज संघासाठी महागात पडले आहेत. अशात भुवनेश्वरच्या जोडीला उमरान मलिक किंवा अर्शदीप सिंग यांना पादार्पणाची संधी दिली जाऊ शकते.
भारतीय संघ: रिषभ पंत (कर्णधार आणि यष्टीरक्षक), ऋतुराज गायकवाड, इशान किशन, दीपक हुड्डा, श्रेयस अय्यर, दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, वेंकटेश अय्यर, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, आवेश खान, अर्शदीप सिंह, उमरान मलिक.
दक्षिण अफ्रीकी संघ: टेबा बावुमा (कर्णधार), क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), रिजा हेंड्रिक्स, हेन्रिच क्लासेन, केशव महाराज, एडेन मार्कराम, डेविड मिलर, लुंगी एनगिडी, एन्रीक नॉर्किया, वायने पर्नेल, ड्वेन प्रिटोरियस, कागिसो रबाडा, तबरेज शम्सी, ट्रिस्टन स्टब्स, रस्सी व्हॅन डर डुसेन, मार्को यानसन.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
धोनी खरंच भारीये राव!, साक्षी सिंग धोनीने शेअर केलेला व्हिडिओ पाहून तु्म्हीही हेत बोलणार
‘भारतीय संघाला जिंकायचे असल्यास पहिल्यांदा करावा लागेल ‘हा’ मोठा बदल’, जहीर खानने दिला मोलाचा सल्ला
व्हीव्हीएस लक्ष्मण असणार भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक, वाचा काय आहे कारण