---Advertisement---

क्रिकेट.. क्रिकेट.. आणि फक्त क्रिकेटच, पाहा पुढील दोन वर्षांचे वेळापत्रक

On: शनिवार, फेब्रुवारी 6, 2021 12:53 PM
---Advertisement---

मागीलवर्षी बरेच महिने क्रिकेट कोरोना व्हायरसमुळे ठप्प पडले होते. पण अखेर वर्षाखेरच्या काही महिन्यांत क्रिकेट सामने सुरु झाले आणि हळुहळू आता क्रिकेट पूर्वपदावर येऊ लागले आहे. त्यामुळे आता भारतीय संघाचे पुढील २ वर्षाचे वेळापत्रकही व्यस्त असल्याचे दिसून येत आहे. नुकतेच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) भारतीय संघाचे पुढील दोन वर्षाचे म्हणजेच  वर्ष २०२१ ते २०२३ दरम्यानचे वेळापत्रक जाहीर केले आहे.

या वेळापत्रकानुसार भारतीय संघ दोन वर्षात चांगलाच व्यस्त राहणाऱ्या असल्याचे दिसते. तसेच या दोन वर्षात भारताला २ टी२० आणि १ वनडे विश्वचषकही खेळायचा आहे. याशिवाय अनेक द्विपक्षीय मालिकाही खेळायच्या आहेत. तर येत्या २ वर्षातील भारतीय संघाचे वेळापत्रक पाहू.

फेब्रुवारी- मार्च २०२१- इंग्लंडविरुद्ध क्रिकेट मालिका –
-सध्या इंग्लंडचा संघ भारत दौऱ्यावर आला असून त्यांना या दौऱ्यात ४ कसोटी, ५ टी२० आणि ३ वनडे सामन्यांची मालिका खेळायची आहे.

एप्रिल-मे २०२१ 
-इंग्लंडच्या भारत दौऱ्यानंतर आयपीएलच्या 14 व्या हंगामाला सुरुवात होईल. हा हंगातम एप्रिल-मे दरम्यान होण्याची शक्यता आहे.

जून ते जुलै २०२१ 
-जर जागतिक कसोटी चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यात भारत पोहचला तर हा सामना खेळण्यासाठी भारताला इंग्लंडला जावे लागेल. हा अंतिम सामना जूनमध्ये लॉर्ड्स या ऐतिहासिक स्टेडियमवर होणार आहे.
-श्रीलंका विरुद्ध भारत (३ वनडे, ५ टी२०)
-आशिया चषक

जुलै २०२१ 
-झिम्बाब्वे विरुद्ध भारत (३ वनडे)

जुलै ते सप्टेंबर २०२१
-इंग्लंड विरुद्ध भारत (५ कसोटी)

ऑक्टोबर २०२१ 
-भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (३ वनडे, ५ टी२०)

ऑक्टोबर ते नोव्हेंबर २०२१
-टी२० विश्वचषक (भारतात)

नोव्हेंबर ते डिसेंबर २०२१ 
-भारत विरुद्ध न्यूझीलंड (२ कसोटी, ३ टी२०)
-दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत (३ कसोटी, ३ टी२०)

भारतीय संघाचे २०२२ चे वेळापत्रक –

जानेवारी ते मार्च २०२२ 
-भारत विरुद्ध वेस्ट इंडिज ( ३ वनडे, ३ टी-२०)
-भारत विरुद्ध श्रीलंका ( ३ कसोटी, ३ टी-२०)

एप्रिल ते मे २०२२
आयपीएल २०२२

जुन २०२२ 
-कोणतीही मालिका नियोजित नाही

जुलै ते ऑगस्ट २०२२ – 
-इंग्लंड विरुद्ध भारत (३ वनडे, ३ टी२०)
-भारत विरुद्ध वेस्ट इंडिज (३ वनडे, ३ टी२०)

सप्टेंबर २०२२ 
-आशिया चषक

ऑक्टोबर ते नोव्हेंबर २०२२ 
-टी२० विश्वचषक २०२२ (ऑस्ट्रेलियामध्ये)

नोव्हेंबर ते डिसेंबर २०२२
-भारत विरुद्ध बांगलादेश (२ कसोटी, ३ टी२०)
-भारत विरुद्ध श्रीलंका (५ वनडे)

भारतीय संघाचे २०२३ चे वेळापत्रक – 

जानेवारी २०२३ 
-भारत विरुद्ध न्यूझीलंड (३ वनडे, ३ टी२०)

फेब्रुवारी ते मार्च २०२३ 
-भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (४ कसोटी, ३ वनडे, ३ टी२०)

एप्रिल ते मे २०२३ 
-आयपीएल २०२३

ऑक्टोबर २०२३ 
-वनडे विश्वचषक

महत्त्वाच्या बातम्या –

विक्रमवीर जो रुट! शतकानंतर इंग्लंडच्या कर्णधाराचे झुंजार दीडशतक, मिळवला नवा किर्तीमान

विराट कोहलीच्या खिलाडूवृत्तीने जिंकल जो रूटचही मन; म्हणाला ‘तो खूप दयाळू आहे, त्याने…’

विराट कोहलीच्या खिलाडूवृत्तीने जिंकल जो रूटचही मन; म्हणाला ‘तो खूप दयाळू आहे, त्याने…’

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---