---Advertisement---

विक्रमवीर जो रुट! शतकानंतर इंग्लंडच्या कर्णधाराचे झुंजार दीडशतक, मिळवला नवा किर्तीमान

On: शनिवार, फेब्रुवारी 6, 2021 12:31 PM
---Advertisement---

भारत विरुद्ध इंग्लंड संघात शुक्रवारपासून (५ फेब्रुवारी) चार सामन्यांची कसोटी मालिका सुरु झाली आहे. या मालिकेतील पहिला सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर होत आहे. या सामन्यात इंग्लंडकडून कर्णधार जो रुटने पहिल्या डावात नाबाद दीडशतकी खेळी केली आहे. विशेष म्हणजे, रुट त्याच्या कारकिर्दीतील हा १०० वा कसोटी सामना खेळत आहे. त्यामुळे त्याने एक खास विक्रम केला आहे.

रुट हा १०० व्या कसोटी सामन्यात दीडशतकाचा टप्पा ओलांडणारा (150+ score) केवळ दुसरा फलंदाज ठरला आहे. रुटपुर्वी पाकिस्तानी दिग्गज इंजमाम-उल-हक यांनी पहिल्यांदा हा किर्तीमान नोंदवला होता.

मार्च २००५ मध्ये बेंगळुरू येथे भारत विरुद्ध पाकिस्तान संघात झालेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात त्यांनी हा पराक्रम केला होता. या सामन्यातील पहिल्या डावात २५ चौकारांच्या मदतीने त्यांनी १८४ धावा केल्या होत्या. या खेळीसाठी त्यांनी २६४ चेंडू खेळले होते.

https://twitter.com/mohanstatsman/status/1357924685451677696?s=20

शतक करत नोंदवला खास विक्रम

याव्यतिरिक्त चेन्नई कसोटीत रुटने शतक करत दिग्गजांच्या विशेष मांदियाळीत स्थान मिळवले आहे. रुट हा १०० व्या कसोटी सामन्यात शतक करणारा जगातील नववा फलंदाज ठरला, तर इंग्लंडचा तिसरा फलंदाज आहे. त्याच्याआधी सर कॉलिन कॉवड्रे, जावेद मियाँदाद, गोर्डन ग्रिनिज, ऍलेक स्टिवर्ट, इंजमाम-उल-हक, रिकी पाँटिंग, ग्रॅमी स्मिथ आणि हाशिम अमलाने असा पराक्रम केला आहे. यातील पाँटिंगने त्याच्या १०० व्या कसोटी सामन्यांत दोन्ही डावात शतके केली आहेत.

कारकिर्दीतील १०० व्या कसोटी सामन्यात शतक करणारे क्रिकेटपटू –
१९६८ – सर कॉलिन कॉवड्रे (१०४ धावा)
१९८९ – जावेद मियाँदाद (१४५ धावा)
१९९० – गोर्डन ग्रिनिज (१४९ धावा)
२००० – ऍलेक स्टिवर्ट (१०५ धावा)
२००५ – इंजमाम-उल-हक (१८४ धावा)
२००६ – रिकी पाँटिंग (१२० धावा आणि १४३* धावा)
२०१२ – ग्रॅमी स्मिथ (१३१ धावा)
२०१७ – हाशिम अमला (१३४ धावा)
२०२१ – जो रुट (१५६* धावा)

महत्त्वाच्या बातम्या-

IND vs ENG Test Live : दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात भारतीय गोलंदाजांच्या पदरी निराशाच; सत्राखेर इंग्लंडच्या ३ बाद ३५५ धावा

विराट कोहलीच्या खिलाडूवृत्तीने जिंकल जो रूटचही मन; म्हणाला ‘तो खूप दयाळू आहे, त्याने…’

IND vs ENG : जो रूटचं शतक आणि भारताच्या खराब गोलंदाजीबद्दल ट्विटरवर कमेंट्सचा भडिमार 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---