---Advertisement---

टी२० विश्वचषकातील टीम इंडियाचे वेळापत्रक झाले निश्चित; पाहा कुठे, कधी अन् कोणाविरुद्ध होणार सामने 

On: शनिवार, ऑक्टोबर 23, 2021 1:32 AM
---Advertisement---

संयुक्त अरब अमिराती आणि ओमान येथे सुरु असलेल्या टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धेतील पहिली फेरी शुक्रवारी (२२ ऑक्टोबर) संपली. यानंतर आता अंतिम १२ संघ मिळाले आहेत. पहिल्या फेरीतून श्रीलंका, बांगलादेश, स्कॉटलंड आणि नामिबिया या ४ संघांनी अंतिम १२ संघात स्थान मिळवले आहे. तर, भारत, पाकिस्तान, न्यूझीलंड, अफगाणिस्तान, वेस्ट इंडिज, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका हे ८ संघ त्यांच्या टी२० क्रमवारीमुळे थेट सुपर १२ फेरीसाठी पात्र ठरले होते. आता २३ ऑक्टोबरपासून सुपर १२ फेरीला सुरुवात होणार आहे.

शुक्रवारी आयर्लंड विरुद्ध नामिबिया यांच्यात झालेल्या सामन्यानंतर सुपर १२ फेरीतील दुसऱ्या गटातील संघांबाबत चित्र स्पष्ट झाले. या गटात भारत, पाकिस्तान, न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान यांना थेट जागा मिळाली होती. पण या गटात आता स्कॉटलंड आणि नामिबियानेही प्रवेश केला आहे.

नामिबियाने पहिल्या फेरीतील त्यांच्या अखेरच्या साखळी सामन्यात आयर्लंडला पराभूत केले आणि अ गटात दुसरा क्रमांक मिळवला. यासह त्यांनी सुपर १२ फेरीसाठी दुसऱ्या गटात स्थान मिळवले. तर, त्याआधी स्कॉटलंडने पहिल्या फेरीतील तिन्ही साखळी सामने जिंकून ब गटात अव्वल क्रमांक मिळवत सुपर १२ फेरीसाठी दुसऱ्या गटात जागा बनवली. त्यामुळे आता या गटाचे वेळापत्रक निश्चित झाले असल्याने भारताच्या वेळापत्रकाचे चित्रही स्पष्ट झाले आहे.

असे होतील भारताचे सामने
सुपर १२ फेरीतील दुसऱ्या गटाच्या सामन्यांना २४ ऑक्टोबरपासून भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याने दुबईत सुरुवात होईल. त्यानंतर भारतीय संघ ३१ ऑक्टोबरला न्यूझीलंडविरुद्ध दुबईत दोन हात करेल. यानंतर ३ नोव्हेंबरला भारताला अफगाणिस्तानविरुद्ध अबुधाबी येथे सामना खेळायचा आहे. तर, यानंतर ५ नोव्हेंबरला पुन्हा दुबईत भारतीय संघ स्कॉटलंडविरुद्ध सामना खेळेल. विशेष म्हणजे याचदिवशी भारताचा कर्णधार विराट कोहलीचा ३३ वा वाढदिवस आहे. यानंतर भारतीय संघ सुपर १२ फेरीतील अखेरचा साखळी सामना नामिबियाविरुद्ध ८ नोव्हेंबरला होणार आहे.

भारताने जिंकले सराव सामने
भारतीय संघाने टी२० विश्वचषकातील अभियानाला सुरुवात करण्यापूर्वी इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेले दोन्ही सराव सामने जिंकले आहेत. त्यामुळे भारतीय संघ या विश्वचषकात आत्मविश्वासाने उतरेल. ही विराट कोहलीची भारताचा टी२० कर्णधार म्हणून अखेरची स्पर्धा आहे. या स्पर्धेनंतर तो टी२० कर्णधारपद सोडणार आहे. त्यामुळे, तो टी२० कर्णधारपदाचा शेवट विजेतेपदासह करण्याचा प्रयत्न करेल.

टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धेसाठी असा आहे भारतीय संघ – 
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), केएल राहुल, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, राहुल चाहर, रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकूर, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह , भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी.

राखीव खेळाडू – श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, दिपक चाहर

भारताच्या सामन्यांचे वेळापत्रक- 
सुपर १२ फेरी – 
२४ ऑक्टोबर – भारत विरुद्ध पाकिस्तान, दुबई ( संध्या- ७.३० वाजता)
३१ ऑक्टोबर – भारत विरुद्ध न्यूझीलंड, दुबई ( संध्या- ७.३० वाजता)
३ नोव्हेंबर – भारत विरुद्ध अफगाणिस्तान, अबुधाबी ( संध्या- ७.३० वाजता)
५ नोव्हेंबर – भारत विरुद्ध स्कॉटलंड, दुबई ( संध्या- ७.३० वाजता)
८ नोव्हेंबर – भारत विरुद्ध नामिबिया, दुबई ( संध्या- ७.३० वाजता)

बाद फेरी – 
१० नोव्हेंबर –  उपांत्य सामना – १, अबुधाबी ( संध्या- ७.३० वाजता)
११ नोव्हेंबर – उपांत्य सामना – २, दुबई ( संध्या- ७.३० वाजता)
१४ नोव्हेंबर – अंतिम सामना, दुबई ( संध्या- ७.३० वाजता)

महत्त्वाच्या बातम्या – 

टी२० विश्वचषकाच्या सामन्यात भारतीय संघासाठी पाकिस्तानचे हे ‘पंचक’ ठरु शकते डोकेदुखी

“मार्गदर्शक रणनीती तयार करण्यास मदत करू शकेल, पण मैदानात प्रत्यक्ष खेळाडूंनाच खेळावे लागेल”

श्रीलंकेने नेदरलँड्सचा ४४ धावांत धूव्वा उडवत मिळवला दणदणीत विजय, ‘हा’ विक्रमही केला नावावर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---