---Advertisement---

कोणासोबत न्याय; कोणावर अन्याय? कशी आहे इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धची टीम इंडिया

---Advertisement---

आयपीएल २०२२ च्या साखळी फेरी सामन्यांचा टप्पा संपण्याच्या दिवशीच ९ जून पासून सुरु होणाऱ्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी२० मालिकेसाठी व इंग्लंड दौऱ्यावरील एकमेव कसोटी सामन्यासाठी भारतीय संघाची घोषणा केली गेली. प्रमुख आणि अनुभवी खेळाडूंना विश्रांती देत टी२० मालिकेसाठी एक नवखा संघ निवडला गेला. तर, मॅंचेस्टर कसोटीसाठी तगडा भारतीय संघ जाईल, असे बीसीसीआय आणि निवड समितीकडून सांगितले गेले आहे. या दोन्ही मालिकांसाठी निवडल्या गेलेल्या भारतीय संघाचा सविस्तर आढावा येथे घेण्यात आला आहे.

सर्वांनाच अपेक्षा होती त्याप्रमाणे, घरच्या मैदानांवर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या पाच टी२० सामन्यांसाठी मालिकेसाठी प्रमुख खेळाडूंना विश्रांती देऊन एक युवा संघ उतरवला गेला. नियमित कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह हे टी२० संघाचा भाग नाहीत. १८ जणांच्या या संघाचे नेतृत्व संघाचा नियमित उपकर्णधार केएल राहुल करणार आहे. तर, या मालिकेसाठी उपकर्णधार म्हणून यष्टीरक्षक रिषभ पंत जबाबदारी पार पाडताना दिसेल. फलंदाजी फळीमध्ये फॉर्मात असलेल्या अनुभवी खेळाडूंना संधी दिली गेली आहे.

ईशान किशन, ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, व्यंकटेश अय्यर व दीपक हूडा या मार्च महिन्यात श्रीलंकेविरुद्ध खेळलेल्या फलंदाजांनी संघातील आपली जागा कायम राखली आहे. टी२० विश्वषकानंतर अष्टपैलू हार्दिक पंड्या भारतीय संघात पुनरागमन करेल. तर, आयपीएल २०२२ मध्ये टॉप फिनिशर बनलेल्या दिनेश कार्तिकने जवळपास चार वर्षानंतर संघात जागा बनवली आहे.

कुलचा म्हणजेच कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहल हे स्पिन ट्विन पुन्हा एकत्र दिसतील. त्यांना अक्षर पटेल व रवी बिश्नोई साथ देतील. वेगवान गोलंदाजी फळीचा विचार केल्यास भुवनेश्वर कुमारकडे त्याचे नेतृत्व राहील. आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करून हर्षल पटेल व आवेश खान यांनीदेखील संघातील आपली जागा वाचवली. या आयपीएलमध्ये सर्वात जास्त प्रभावी करणाऱ्या नव्या यॉर्कर किंग अर्शदीप सिंग व सनरायझर्स हैदराबादसाठी खेळणाऱ्या स्पीडस्टार उमरान मलिक यांना प्रथमच भारतीय संघाची जर्सी घालण्याची संधी मिळू शकते.

कोणाला संधी कोणावर अन्याय?
वेगवान गोलंदाज उमरान मलिक व अर्शदीप सिंग यांना संधी देत बीसीसीआयने भविष्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. मात्र, आयपीएलच्या साखळी फेरी सामन्यांमध्ये ४०० पेक्षा जास्त धावा करणाऱ्या राहुल त्रिपाठीवर अन्याय झाल्याचे चाहत्यांनी म्हटले आहे. त्याचसोबत आपल्या नेतृत्वाने आणि उमद्या फलंदाजीने राजस्थान रॉयल्सला प्ले ऑफपर्यंत नेणाऱ्या संजू सॅमसन‌ याचाही विचार व्हायला हवा होता अशी भावना, व्यक्त केली जात आहे.

याबरोबरच, मागील वर्षी इंग्लंड दौऱ्यावर बाकी राहिलेल्या मॅंचेस्टर कसोटीसाठीदेखील संघाची घोषणा झाली. गेल्या वर्षी कोविडमूळे पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील हा शेवटचा सामना स्थगित केला गेला होता. भारतीय संघ या मालिकेमध्ये २-१ अशा आघाडीवर आहे. मागील वर्षी जेव्हा भारतीय संघाने हा दौरा केला होता, तेव्हा विराट कोहली भारतीय संघाचा कर्णधार होता. आता या एकमेव कसोटीमध्ये रोहित शर्मा भारतीय संघाचं नेतृत्व करेल. केएल राहुल, श्रेयस अय्यर, शुभमन गिल, हनुमा विहारी यांच्यावर फलंदाजीची भिस्त असेल. खराब कामगिरीमुळे भारतीय संघातून बाहेर व्हायच्या उंबरठ्यावर असलेल्या चेतेश्वर पुजाराला काउंटी चॅम्पियन शिपमधील कामगिरीचे बक्षीस मिळाले आहे. ४ सामन्यांमध्ये ८०० धावा केल्याने त्याला पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे. रिषभ पंत संघाचा फर्स्ट चॉइस यष्टीरक्षक असेल. तर, भविष्याचा विचार करून केएस भरतला संधी दिली आहे. याचाच अर्थ वृद्धिमान साहा याची आंतरराष्ट्रीय कारकिर्द देखील संपल्यात जमा आहे.

आफ्रिका आणि इंग्लंड विरुद्ध घोषीत करण्यात आलेल्या टीम इंडियाचं स्कॉड अनालिसिस | Team India Squad

वेगवान गोलंदाजी विभागामध्ये जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव व प्रसिद्ध कृष्णा असा तोफखाना असेल. अष्टपैलू म्हणून शार्दुल ठाकूर व रवींद्र जडेजा आपली जागा वाचवण्यात यशस्वी ठरले. संघातील एकमेव फिरकीपटू म्हणून रविचंद्रन अश्विन जबाबदारी सांभाळेल.

या कसोटीसाठी काही नावांचा विचार झाला नाही. त्यापैकी एक म्हणजे माजी कर्णधार अजिंक्य रहाणे होय. खराब फॉर्म आणि त्यातच दुखापत यामुळे रहाणे या दौऱ्यावर खेळताना दिसणार नाही… अनुभवी वेगवान गोलंदाज ईशांत शर्मा हा देखील पुन्हा भारतासाठी खेळणार की नाही, यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तर वॉशिंग्टन सुंदर व अक्षर पटेल यांच्या नावाची या एकमेव कसोटीसाठी चर्चादेखील झाली नसल्याचे सांगण्यात येते आहे.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा

महत्वाच्या बातम्या-

वयाच्या छत्तीशीत टीम इंडियात पुनरागमन करणाऱ्या कार्तिकचं अख्तरकडून कौतुक; म्हणाला, ‘पर्सनल गोष्टी…’

भारतीय संघात पुनरागमन केलेल्या दिनेश कार्तिकने गायले पाकिस्तानी कर्णधाराचे गुणगान; म्हणाला, ‘तो एक चांगला…’

Video: फक्त एक स्टंप दिसत असतानाही गोलंदाजाने उडवल्या बेल्स; थ्रो पाहून सर्वजण हैराण

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---