---Advertisement---

आयपीएल 2025 पूर्वी हार्दिक पांड्याला धक्का! मुंबईच्या कर्णधारपदासाठी हा खेळाडूने केली ईच्छा व्यक्त

Hardik Pandya, Jasprit Bumrah
---Advertisement---

आयपीएलच्या मागील हंगमात मुंबई इंडियन्सने संघात मोठा बदल केला. रोहित शर्माच्या जागी हार्दिक पांड्याला संघाचा कर्णधार म्हणून नियुक्त केले. जे की तो संघावर उलटला या दरम्यान हार्दिकच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने खराब कामगिरी केली. परिणामी स्पर्धे शेवटी संघ गुणतालिकेत शेवटच्या स्थानावर राहिला. मागील हंगामात एमआयने केवळ 4 सामने जिंकले होते. अशा परिस्थितीत आता आयपीएल 2025 सुरू होण्यापूर्वी मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदावर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

आता अश्या स्थितीत या भारतीय खेळाडूच्या नुकत्याच झालेल्या विधानाचा अर्थ असा केला जात आहे की, तो आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार म्हणून हार्दिक पांड्याची जागा घेऊ शकतो.

भारत सध्या बांग्लादेशविरुद्ध 3 टी-20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. अशा परिस्थितीत भारतीय टी-20 कर्णधार सूर्यकुमार यादव आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचा कर्णधार म्हणून प्रबळ दावेदार असल्याचे बोलले जात आहे. भारतीय कर्णधार असण्यासोबतच सूर्यकुमार यादव हा टी20 क्रिकेटचा हुशार खेळाडू आहे. अशा स्थितीत मुंबई इंडियन्स साहजिकच त्याला राखून ठेवलेल्या खेळाडूंच्या यादीत ठेवेल. सूर्यकुमार यादवने बांग्लादेशविरुद्धच्या टी20 सामन्याच्या तयारीदरम्यान आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदाशी संबंधित प्रश्नांची उत्तरे दिली.

यादरम्यान सूर्यकुमार हसत म्हणाला, “तुम्ही गुगली प्रश्न विचारलात. मी सध्या भारतीय संघाचा कर्णधार म्हणून माझ्या नव्या भूमिकेचा आनंद घेत आहे. जेव्हा मी रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सकडून खेळायचो तेव्हा त्याच्या सांगण्यावरून मी माझे मत अनेकदा व्यक्त केले आहे. श्रीलंकेविरुद्ध टी20 कर्णधार म्हणून माझी नवीन भूमिका सुरू करण्यापूर्वीच मी ऑस्ट्रेलिया आणि आफ्रिकेविरुद्ध संघाचे नेतृत्व केले आहे. अशा परिस्थितीत संघाला पुढे नेण्याबाबत मी सर्व कर्णधारांकडून शिकलो आहे. तूर्तास पुढे जे होईल ते कळेलच.

सूर्यकुमार यादवच्या या विधानामुळे चर्चेला उधाण आले आहे की तो मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद भूषवू शकतो. मात्र, याप्रकरणी मुंबई इंडियन्स व्यवस्थापन काय निर्णय घेते. हे लक्षवेधी ठरणार आहे.

सूर्याच्या आयपीएल कारकिर्दीबाबत बोलायचे झाल्यास सूर्यकुमार यादवने, 2012 मध्ये मुंबई इंडियन्सकडून पदार्पण केले. मात्र त्यानंतर तो आयपीएल 2014 ते आयपीएल 2017 पर्यंत कोलकाता नाइट रायडर्सचा भाग होता. आयपीएल 2018 मध्ये मुंबई इंडियन्समध्ये पुनरागमन केल्यानंतर सूर्यकुमार यादव आतापर्यंत या संघाचा एक भाग आहे. या दरम्यान सूर्यकुमार यादवने त्याच्या आयपीएल कारकिर्दीत एकूण 150 सामने खेळले आहेत. ज्यात 145.32 च्या स्ट्राइक रेटने 3594 धावा केल्या आहेत. या दरम्यान त्याने 2 शतके आणि 24 अर्धशतक ठोकल्या आहेत.

हेही वाचा-

भारतात होणार पुढील आशिया कप, परंतु रोहित-विराट खेळणार नाहीत! कारण जाणून घ्या
संजूचे नशीब उजळले! सूर्याच्या नेतृत्तवात नव्या भुमिकेत दिसणार, सामन्यापूर्वी संघात मोठे बदल!
आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये सर्वाधिक मेडन ओव्हर्स टाकणारे गोलंदाज, टॉप-5 मध्ये दोन भारतीयांचा समावेश

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---