आयर्लंड-इंग्लंडमध्ये टी२० आणि वनडे मालिका जिंकून वेस्ट इंडिजमध्ये पोहोचलेल्या भारतीय क्रिकेट संघाने वेस्ट इंडिजविरुद्धही आपली विजयी लय कायम राखली. शिखर धवनच्या नेतृत्वात वनडे मालिकेत यजमान संघाला क्लीन स्वीप दिल्यानंतर, आता रोहित शर्माच्या नेतृत्वात भारताने टी२० मालिकाही खिशात घातली आहे. फ्लोरिडा येथे खेळल्या गेलेल्या मालिकेतील चौथ्या सामन्यात भारतीय संघाने यजमान वेस्ट इंडिजचा ५९ धावांच्या मोठ्या फरकाने एकतर्फी पराभव करत मालिकेत ३-१ अशी विजयी आघाडी घेतली. वेगवान गोलंदाज आवेश खान सामन्याचा मानकरी ठरला.
For his match-winning bowling display of 2⃣/1⃣7⃣, @Avesh_6 bags the Player of the Match award as #TeamIndia take an unassailable lead in the T20I series. 👏 👏 #WIvIND
Scorecard ▶️ https://t.co/DNIFgqfRJ5 pic.twitter.com/T33sZ7Gi5i
— BCCI (@BCCI) August 6, 2022
फ्लोरिडा येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात वेस्ट इंडिजचा कर्णधार निकोलस पूरनने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. भारतासाठी कर्णधार रोहित शर्मा व सूर्यकुमार यादव यांनी वेगवान अर्धशतकी सलामी दिली. मात्र, दोघांनाही मोठी खेळी करता आली नाही. त्यानंतर रिषभ पंत व दीपक हुडा यांनी भारताचा डाव सावरला. पंतने सर्वाधिक ४४ धावांचे योगदान दिले. अखेरीस अष्टपैलू अक्षर पटेलने वेगवान २० धावा काढत भारताची धावसंख्या वाढवली. संजू सॅमसन ३० धावा करून नाबाद राहिला. भारताने निर्धारित २० षटकात १९१ धावा धावफलकावर लावल्या.
भल्या मोठ्या धावांचा पाठलाग करताना वेस्ट इंडिज संघ पहिल्यापासूनच अडखळला. नियमित अंतराने त्यांचे गडी बाद होत गेले. निकोलस पूरनने अक्षर पटेलला एकाच षटकात तीन षटकार ठोकले. मात्र, तो दुर्दैवाने धावबाद झाला. त्यानंतर कोणीही आश्वासक खेळी न केल्याने वेस्ट इंडीजचा संघ १३२ धावांवर सर्वबाद झाला. भारताकडून अर्शदीप सिंगने सर्वाधिक तीन बळी मिळवले. तर आवेश खान व रवी बिश्नोई यांना प्रत्येकी दोन बळी घेण्यात यश आले. मालिकेतील अखेरचा सामना याच मैदानावर रविवारी (७ ऑगस्ट) खेळला जाईल.
महत्त्वाच्या बातम्या-
CWG BREAKING: कुस्तीत भारताचा ‘सुवर्ण’ षटकार; १९ वर्षाच्या नवीनने जिंकले गोल्ड
पुन्हा एकदा चक दे! भारतीय हॉकी संघही फायनलमध्ये; गोल्ड मेडलसाठी ठोकणार दावेदारी
‘हिटमॅन’ बनला सोळा हजारी मनसबदार! दिग्गजांच्या यादीत वादळी खेळीसह पदार्पण