---Advertisement---

अर्रर्र! भारतीय संघाला एक नाही, तर दोन धक्के; महत्त्वाच्या मालिकेला मुकणार स्टार खेळाडू; वाचा

On: शनिवार, डिसेंबर 23, 2023 12:38 PM
Hardik-Pandya-And-Rohit-Sharma
---Advertisement---

भारतीय क्रिकेटमधून मोठी बातमी समोर येत आहे. भारतीय संघाच्या अडचणी थांबायचं नावच घेत नाहीयेत. आता दुखापतींमुळे टीम इंडियाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. खरं तर, भारतीय संघ पुढील महिन्यात अफगाणिस्तानविरुद्ध टी20 मालिका खेळणार आहे. या मालिकेपूर्वी भारतीय संघाचा स्टार फलंदाज दुखापतग्रस्त झाल्यामुळे दीर्घ काळासाठी क्रिकेटपासून दूर झाला आहे. हा खेळाडू इतर कुणी नसून सूर्यकुमार यादव आहे.

खरं तर, सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) याच्या घोट्याला दुखापत झाली आहे आणि तो अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेत खेळू शकणार नाही. सूर्याच्या घोट्याला 14 डिसेंबर रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या टी20 सामन्यात खेळताना दुखापत झाली होती. तसेच, आता तो बंगळुरूच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये रिहॅबसाठी जाईल.

https://twitter.com/CricCrazyJohns/status/1738213325790654965

अलीकडेच केले होते शानदार नेतृत्व
मुंबईचा रहिवासी असलेला 33 वर्षीय फलंदाज सूर्या अलीकडेच ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका संघाविरुद्ध टी20 मालिकेत भारतीय संघाचा कर्णधार होता. त्याने या दोन्ही मालिकेत दमदार प्रदर्शन करत भारताचा नियमित कर्णधार रोहित शर्मा याच्या अनुपस्थितीत संघासाठी शानदार प्रदर्शन केले. मात्र, जगातील अव्वल टी20 फलंदाज सूर्या दुखापतीमुळे आता थेट आयपीएल 2024 हंगामात खेळताना दिसू शकतो. पीटीआयच्या वृत्तानुसार, सूर्या जानेवारीमध्ये अफगाणिस्तानविरुद्धच्या टी20 मालिकेतही खेळणार नाही आणि उन्हाळ्यात इंग्लंडविरुद्ध मायदेशातील कसोटी मालिकेसाठीही उपलब्ध नसण्याची शक्यता आहे. अशात सूर्या थेट आयपीएल खेळताना दिसेल.

‘या’ खेळाडूविषयीही मोठी अपडेट
याव्यतिरिक्त नुकतीच अशी माहितीही समोर आली आहे की, भारताचा उपकर्णधार हार्दिक पंड्या (Hardik Pandya) याच्या अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेत खेळण्यावर शंका आहे. वृत्तांनुसार, दुखापतग्रस्त पंड्या अफगाणिस्तानविरुद्धच्या टी20 मालिकेत पुनरागमन करणार असल्याचे बोलले गेले होते, पण मुंबई इंडियन्स संघाचा नवीन कर्णधार पंड्या आयपीएल 2024 पूर्वी बरा होण्याची शक्यता खूपच कमी दिसत आहे. वृत्तांमध्ये सूत्रांच्या हवाल्याने सांगितले गेले की, “हार्दिकच्या फिटनेसवर अद्याप कोणतीही अपडेट नाहीये आणि आयपीएल संपण्यापूर्वी त्याच्या उपलब्धतेवरही प्रश्नचिन्ह आहे.”

भारतीय संघाची दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिका
खरं तर, 26 डिसेंबरपासून भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (INDvsSA Test) संघातील 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. त्यानंतर 11 जानेवारीपासून मायदेशात अफगाणिस्तानविरुद्ध 3 सामन्यांची टी20 मालिका खेळली जाईल. अशात आता टी20 संघाची निवड या दोन स्टार खेळाडूंच्या अनुपस्थितीत होणार आहे, तेव्हा सर्व क्रिकेटप्रेमींच्या नजरा याकडेच लागल्या आहेत. (team india these two players will not able to play t20 series against afghanistan due to injury know here)

हेही वाचा-
T20 World Cup 2024 जिंकण्यासाठी ‘या’ बलाढ्य संघाचा मास्टरस्ट्रोक प्लॅन, पोलार्डकडे सोपवणार ‘ही’ जबाबदारी!
‘मला भारतीय आर्मीबरोबर आणखी वेळ घालवायचा आहे’, भारतीय क्रिकेटरने व्यक्त केली अपेक्षा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---